तिथी
|
पौष कृष्ण ४ (११:१५)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
पूर्वाफाल्गुनी (२३:१७)
|
योग
|
सौभाग्य (१२:५३)
|
करण
|
कौलव (२३:२२)
|
घबाड
११:१५ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी
शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: उत्तराषाढा
चंद्र
नक्षत्र : पूर्वाफाल्गुनी
तिथी: कृष्ण ४ = १५ + ४ = १९
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८
x ३ = ५४
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १९ तिथी मिळवू : ५४ + १९ = ७३
आता
७ ने भागू ७३ / ७ = १० ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
पंचमी श्राद्ध
अपराण्ह काळी पंचमी तिथी
असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी पौष कृष्ण ५ आहे त्यांचे या दिवशी श्राद्ध
करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राद्धतिथी ज्या दिवशी अपराण्ह काळी असते त्या दिवशी
ते श्राद्ध करावे.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त
प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ,
त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने
दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व
कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment