Wednesday, 25 January 2017

दिनविशेष - २६ जानेवारी – २०१७

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


तिथी
 पौष कृष्ण १४ (२९:०२)   
वार
 गुरुवार
नक्षत्र
 पूर्वाषाढा (२०:३२)
योग
 हर्षण (१५:३९)
करण
 विष्टि (१६:३३)


गणराज्य दिन

भारतीय प्रजासत्ताक दिवस  भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी जानेवारी २६ रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना घटना समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.

शिवरात्रि

कृष्ण चतुर्दशीला शिवरात्रि साजरी करतात. निशीथ काळी (रात्रीचा आठवा मुहूर्त) शिवपूजेचे विशेष महत्व आहे.

शनि धनु राशीत प्रवेश

पौष कृष्ण १४ गुरूवार दिनांक २६-०१-२०१७ रोजी सायंकाळी ७:२९ वाजता शनि धनु राशीत प्रवेश करीत आहे. त्याचा पुण्यकाल गुरुवारी सायंकाळी ४:३५ ते रात्री १०:२३ पर्यंत आहे. पुण्यकालात जप, दान, पूजा करणे पुण्यकारक व पीडापरिहारक आहे.

हा धनु राशीचा शनी आपल्या जन्म राशिपासुन प्रत्येक राशिला पुढीलप्रमाणे :
धनु राशिला पहिला
वृश्चिक राशिला दुसरा
तुला राशिला तिसरा
कन्या राशिला चवथा
सिंह राशिला पाचवा
कर्क राशिला सहावा
मिथुन राशिला सातवा
वृषभ राशिला आठवा
मेष राशिला नववा
मीन राशिला दहावा
कुंभ राशिला अकरावा
मकर राशिला बारावा याप्रमाणे आहे

प्रत्येक राशिनुसार पाद आणि फळ
रास
पाद    
फळ
कर्क, धनु, कुंभ
सुवर्ण पाद
चिंता
मेष, सिंह, वृश्चिक
रौप्य पाद
शुभ
मिथुन, तुला, मीन
ताम्र पाद
श्रीप्राप्ति
वृषभ, कन्या, मकर
लोह पाद
कष्ट
वरील प्रमाणे आपल्या राशीला शनि कोणत्या पादाने आला व त्याची फळे जाणावीत।

भद्रा

१६:३३ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.

अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.

योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय. तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून सर्व कार्यास प्रशस्त मानावे.

चतुर्दशी श्राद्ध

अपराण्ह काळी चतुर्दशी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी पौष कृष्ण १४ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment