Monday, 9 January 2017

दिनविशेष - १० जानेवारी – २०१७



तिथी
 पौष शुक्ल १३ (२२:५४)   
वार
 मंगळवार
नक्षत्र
 रोहिणी (७:५६), मृग (२९:३३)
योग
 शुक्ल (९:०२), ब्रह्मा (२९:१५)
करण
 कौलव (१२:२८)


भौम प्रदोष

सूर्यास्तानंतर पुढे ३ मुहूर्त (म्हणजे मध्यम मानाने  साधारण २ तास २४ मिनिटे ) प्रदोष काळ असतो.
प्रत्येक चांद्र मासात प्रदोष काळी जेव्हा त्रयोदशी असेल त्या दिवशी प्रदोष निमित्त उपास करतात.
कामनाभेद ' हा या व्रताचा विशेष आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला हे व्रत करावे. याप्रमाणे एक वर्षभर करावे. व्रतादिवशी प्रात: स्नान करुन
'मम पुत्रादिप्राप्तिकामनया प्रदोषव्रतमहं करिष्ये'

 इ. संकल्प करून व्रतारंभ करावा. सायंकाळी पुन्हा स्नान करावे. श्रीशंकराचे पुढे बसून वेदपाठी ब्राह्मणाज्ञेप्रमाणे पुढील मंत्राने प्रार्थना करावी व षोड्शोपचारे पूजा करावी.

भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे । ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥

भाजलेले सातूचे पीठ , तूप व साखरेचा नैवेद्य अर्पण करावा. याप्रमाणे करून तेथेच आठ दिशांना आठ दिवे प्रज्वलित करावेत व प्रत्येक दिवा लावताना आठ वेळा नमस्कार करावा.
'धर्मस्त्वं वृष रूपेण जगदानन्दकारक।
अष्टमूर्तैरधिष्ठानं अथः पाहि सनातन ।'
 या मंत्राने नंदिकेश्वराला पाणी दुर्वा आदि देऊन त्याची पूजा करावी व त्याला स्पर्श करुन पुढील मंत्राने शंकर, पार्वती आणि नंदिकेश्वराची प्रार्थना करावी.  

ऋणरोगादि दारिद्र्यम ये चान्ये चापम्रुत्यव: !
भय क्लेश मनस्ताप: नश्यनंतु मम सर्वदा !! "
( कर्ज,रोग,गरिबी,अपम्रूतू,भय, त्रास ईत्यादि मनस्ताप माझे  कायमचे नाहिशे होवोत.)

हे व्रत विशेषत: स्त्रियांनी करण्याचे आहे. नंदीच्या शेपूट व शिंगे आदींच्या स्पर्शाने अभीष्टसिद्धी होते.
Ø  सोमवार: शांतीरक्षणासाठी सोम प्रदोष करावा.
Ø  मंगळवार: ऋणमुक्त होण्यासाठी भौम प्रदोष करावा.
Ø  शुक्रवार: सौभाग्य किंवा स्त्री-समृद्धीची इच्छा असेल तर शुक्रवारी हे व्रत करावे.
Ø  शनिवार: पुत्र प्राप्तीसाठी शनिप्रदोष वर्षभर किंवा फलप्राप्ती होई पर्यंत करावा. 
Ø  रविवार: आयुर्दायासाठी अर्कप्रदोष हे व्रत करावे.

घृतदान

पौष शुक्ल त्रयोदशीला भगवंतची पूजा करून ब्राह्मणाला घृत दान द्यावे. सर्व कामना पूर्ण होतात असे मानले जाते.

फत्तेहयाजदहम

यालाच फत्तेह-ए-यज्दाहम / फत्तेह-दोअज़-दहम (Fateha-i-Yajdaham or Fateha Doaz daham) सेही म्हणतात. इस्लामी प्रेषित घोस-ए-अझम शेख अब्दुल कादिर गिलानी रहमतुलाह (Ghos e Azam Shaikh Abdul Qadir Gilani Rahmtullah) यांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. बांगलादेश मध्ये या दिवशी राष्टीय सुट्टी असते. भारत आणि पाकिस्तान या देशातही हा सण साजरा केला जातो. याला Big Eleventh किंवा Badi Gyarween Sharif असेही संबोधले जाते.

रवि उत्तराषाढा प्रवेश

२५:०५ ला रवि उत्तराषाढा नक्षत्रात प्रवेश करीत आहे.

घबाड

७:५६ नंतर २२:५४ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: पूर्वाषाढा
चंद्र नक्षत्र : मृग
तिथी: शुक्ल १३
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १३
१३ x ३ = ३९
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १३ तिथी मिळवू : ३९ + १३ = ५२
आता ७ ने भागू  ५२ / ७ = ७ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

यमघंट योग

२९:३३ नंतर मंगळवारी आर्द्रा नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त


यमघंट योगावर जन्म झाल्यास बालकाला कष्ट होतात. (शांती केल्यास हे कष्ट नष्ट होतात.)
यमघंट योगावर प्रयाण केले असता मृत्यू
ग्रहप्रवेश केला असता कुलक्षय
देवास्थापाना केली असता मृत्यू हि फळे मिळतात.

याशिवाय
चैत्र शुक्ल पक्ष, शुक्ल ५, गुरुवार व कृत्तिका नक्षत्र असल्यास (भरणी नक्षत्राची ९ घटिका २० पळे संपल्यावर पुढे) देखील यमघंट योग होतो.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment