तिथी
|
पौष कृष्ण ९ (१९:२७)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
स्वाती (०८:०३)
|
योग
|
शूल (१३:२३)
|
करण
|
वणिज (--:--)
|
भारतीय माघ मासारंभ
भारतीय कालगणनेनुसार माघ
मास आरंभ होत आहे.
घबाड
१९:२७ नंतर घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी
शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: उत्तराषाढा
चंद्र
नक्षत्र : विशाखा
तिथी: कृष्ण १० = १५ + १० = २५
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २३
२३
x ३ = ६९
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे २५ तिथी मिळवू : ६९ + २५ = ९४
आता
७ ने भागू ९४ / ७ = १३ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
दग्ध योग
१९:२७ पर्यंत शनिवारी नवमी
तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार
यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती
मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
|
नवमी श्राद्ध
अपराण्ह काळी नवमी तिथी
असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी पौष कृष्ण ९ आहे त्यांचे या दिवशी श्राद्ध
करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राद्धतिथी ज्या दिवशी अपराण्ह काळी असते त्या दिवशी ते
श्राद्ध करावे.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त
प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ,
त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने
दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व
कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment