Friday, 6 January 2017

दिनविशेष - ७ जानेवारी – २०१७



तिथी
 पौष शुक्ल ९ (१०:२२)   
वार
 शनिवार
नक्षत्र
 अश्विनी (१४:१८)
योग
 सिद्ध (१९:४७)
करण
 तैतिल (२१:१०)


ध्वजनवमी

पौष शुक्ल नवमीस हे नाव आहे. या तिथीला शाकंभरी असे म्हणतात. या दिवशी चंडिकेच्या पूजेचे विशेष महत्व आहे. पताकांनी देवीचे देऊळ सुशोभित करणे, कुमारिकांना भोजन घालणे आणि उपवास किंवा एकभुक्त करणे असा या व्रताचा विधी आहे.
फल- आरोग्य, शक्ती व संपत्ती यांची प्राप्ती.

उभय नवमी

एक तिथिव्रत. पौष मासातल्या शुक्ल आणि वद्य नवमीस भगवतीची त्रिकाल पूजा करतात. देवीची मूर्ती पिठाची करतात. ती चतुर्भज व शूलधारिणी असावी, असे सांगितले आहे. तिला घृताने स्नान घालतात. खीरभाताचा नैवेद्य दाखवतात. कुमारीला भोजन घालतात. अशा प्रकारे प्रत्येक महिन्यांच्या उभय नवमीस दुर्गेची विविध रूपे बनवून पूजा करतात.
फल- दुर्गानिवास.

दग्ध योग

१०:२२ पर्यंत शनिवारी नवमी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी




संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment