Wednesday, 18 November 2015

दिनविशेष - १८ नोव्हेंबर २०१५

तिथी
 कार्तिक शुद्ध ७ (२४:३९) 
वार
 बुधवार
नक्षत्र
 श्रवण (१९:५४)
योग
 वृद्धी (२२:२१)
करण
 गरज (१३:१५)

कल्पादि

ब्रह्मदेवाच्या  दिवसाच्या आरम्भाची जी तिथी असते तिला कल्पादी असे म्हणतात. पुढील सात तिथी कल्पादी आहेत.
१)      चैत्र - शु ५,
२)      चैत्र – कृ ५
३)      वैशाख – शु ३
४)      कार्तिक - शु ७
५)      मार्गशीर्ष – शु ९
६)      माघ – शु १३
७)      फाल्गुन – कृ ३

भद्रा


२४:३९ नंतर भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

शाक सप्तमी

कार्तिक शु. सप्तमीस शक्य त्या भाजीपाल्याचे दान करून रात्री स्वत:ही शाकान्नच घ्यावे आणि नंतर प्रत्येक शु. सप्तमीला एक वर्षपर्यंत हेच व्रत करीत राहावे. त्यायोगे संपूर्ण रोगापासून मुक्ती मिळते.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment