Saturday, 7 November 2015

दिनविशेष - ८ नोव्हेंबर २०१५

तिथी
 आश्विन वद्य १२ (१६:३२) 
वार
 रविवार
नक्षत्र
 हस्त (अहोरात्र)
योग
 विष्कंभ (२७:५३)
करण
 गरज (२९:५१)

कृष्णद्वादशी / वासुदेव द्वादशी

या द्वादशीस उपवास, वासुदेवाची पूजा करतात. या तिथीस 'वासुदेव द्वादशी' असेही नाव आहे.

गुरुद्वादशी

आश्‍विन वद्य द्वादशीस 'गुरुद्वादशी' असे म्हणतात दत्तात्रेयाचे एक अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांची ही पुण्यतिथी होय.
आश्‍विन वद्य द्वादशीस । नक्षत्र मृगराज परियेसी ।
श्रीगुरु बैसले निजानंदेसी । अदृश्य झाले गंगेत ॥
या दिवशी दत्तक्षेत्रामध्ये विशेषत: नरसोबाच्या वाडीस दीपोत्सव, गुरुचरित्राची पारायणे; संतर्पणे वगैरे कार्यक्रम होतात.

नीरांजन द्वादशी

आश्‍विन वद्य द्वादशीला प्रात:स्नानादि होताच काशाच्या चकचकीत ताम्हणात गंध, पुष्प, अक्षता, पाण्याने भरलेले भांडे इ. ठेवून मग त्या ताम्हणाने देव, ब्राह्मण, आपल्यापेक्षा वयाने मोठे, आई-वडील, तसेच घोडे इ.ना ओवाळावे. लागोपाठ असे पाच दिवस केल्यास अक्षय फलप्राप्ती होते.

दग्धयोग

१६:३२ पर्यंत रविवारी द्वादशी असल्यामुळे दग्धयोग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी



अमृत योग

रविवारी हस्त नक्षत्र असल्यामुळे अहोरात्र अमृतयोग  होत आहे. हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो. 
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.

गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज


No comments:

Post a Comment