तिथी
|
कार्तिक शुद्ध १३ (१०:१४)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
अश्विनी (९:५८)
|
योग
|
वरीयान (२३:५६)
|
करण
|
गरज (२०:४१)
|
आवळीभोजन
आवळीचे झाडाखाली विष्णूपूजन
करावे
कार्तिक शुद्ध दशमीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी आवळीच्या झाडाखाली
स्वयंपाक करून इष्टमित्रांसह भोजन करतात. पूजाविधी आवळीपूजनाप्रमाणेच असतो.
महाराष्ट्रात व कर्नाटकात देवस्थान असेल त्या ठिकाणची देवाची मूर्ती पालखीत बसवून
आवळीच्या झाडाखाली आणतात. मग देवाला तेथे महानैवेद्य करून भोजन झाल्यावर सायंकाळी
देव मिरवणुकीने देवळात परत नेतात.
वैकुंठ चतुर्दशीचा उपवास
मध्यरात्री विष्णूपूजन करून
अरुणोदयी शिवपूजन करावे.
वैकुंठ चतुर्दशीचा उपवास आदले दिवशी करावा. कारण हेमलंब नामक संवत्सरी
कार्तिकी शु. चतुर्दशी दिवशी प्रत्यक्ष भगवान विष्णूनीच मणिमर्णिका घाटावर आंघोळ
करून श्रीशिवांचे पूजन केले होते.
यासाठी विष्णुपूजेला रात्रिव्यापिनी व शिवपूजेला अरुणोदयव्यापिनी तिथी असावी.
घबाड
९:५८
नंतर १०:१४ पर्यंत घबाड
योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: अनुराधा
चंद्र
नक्षत्र : भरणी
तिथी:
१३
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १३
१३
x ३ = ३९
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १३ तिथी
मिळवू : ३९+१३ = ५२
आता
७ ने भागू ५२ / ७ = ७ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
अमृतसिद्धी योग
९:५८
पर्यंत मंगळवारी अश्विनी नक्षत्र असल्यामुळे गृह
प्रवेशास वर्ज असा अमृतयोग होत आहे. हा
शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार
यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा
योग होतो.
रविवार – हस्त
|
सोमवार – मृग / श्रवण
|
मंगळवार – अश्विनी
|
बुधवार – अनुराधा
|
गुरुवार – पुष्य
|
शुक्रवार – रेवती
|
शनिवार – रोहिणी
|
|
हा सामन्यात:
सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
|
विवाहास वर्ज
|
शनिवार – रोहिणी
|
प्रयाणास वर्ज
|
मंगळवार – अश्विनी
|
गृहप्रवेशास वर्ज
|
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment