Monday, 2 November 2015

दिनविशेष - ३ नोव्हेंबर २०१५

तिथी
 आश्विन वद्य ८ (३०:३९) 
वार
 मंगळवार
नक्षत्र
 पुष्य (१७:५२)
योग
 शुभ (२३:५१)
करण
 बालव (१७:५४)

कालाष्टमी

प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी शिव पूजन शुभ मानले जाते.

कराष्टमी

आश्विन महिन्यांतील वद्य अष्टमी.  या दिवशीं कुमारिका गंगोदकानें भरलेला करा हातांत घेऊन देवीची पूजा करतात.  ही चाल काशीच्या बाजूस दृष्टीस पडते.
कराष्टमीपासून दिवाळीपर्यंतचे दिवस - यांत एक एक दिवा दररोज जास्त लावण्याची पद्धत आहे.

दम्पत्यष्टमी


पुत्रप्राप्तीच्या इच्छॆने स्त्री-पुरुषांना हे व्रत करता येते. हे व्रत करताना आश्‍विन व. अष्टमी दिवशी दर्भाचे शिव-पार्वती तयार करून त्यांची पंचोपचार पूजा करावी. जवळच ब्राह्मणपूजन करून त्यास दक्षिणा द्यावी. या व्रताने पुत्रप्राप्ती होते. हे व्रत चंद्रोदयव्यापिनी तिथीस करावे; म्हणून दोन दिवस तिथी असेल अगर दोन्ही दिवस (चंद्रोदयव्यापिनी ) नसेल तर दुसर्‍या दिवशी व्रत करावे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment