Wednesday, 18 November 2015

दिनविशेष - १९ नोव्हेंबर २०१५

तिथी
 कार्तिक शुद्ध ८ (२३:०९) 
वार
 गुरुवार
नक्षत्र
 धनिष्ठा (१९:०९)
योग
 ध्रुव (१९:५८)
करण
 विष्टी (११:५७)

दुर्गाष्टमी

प्रत्येक महिन्यातील शुक्ल अष्टमीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी दुर्गामातेचे पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.

गोपाष्टमी / गोष्ठाष्टमी

गाईचे पूजन व प्रदक्षिणा, गाईचे मागून चालावे.
या दिवशी पहाटे गाईंना आंघोळ घालावी. गंधफुलांनी त्यांची पूजा करावी व वस्त्रालंकारांनी त्यांना सजवावे. शिवाय गोपाळां (गुराख्यां) चे पूजन करून गाईंना गोग्रास द्यावा. प्रदक्षिणा घालावी व गाईंच्या मागून थोडा काळा चालत जावे. असे केल्याने इच्छित फळ मिळते. याच दिवशी सायंकाळी गाई चरून येताच त्यांना नमस्कार करून, त्यांची पंचोपचार पूजा करावी. त्यांना पंचपक्वान्ने खावयास घालून त्यांची पायधूळ मस्तकी धारण करावी. यायोगे सौभाग्यवृद्धी होते.

भद्रा

११:५७ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment