Friday, 6 November 2015

दिनविशेष - ७ नोव्हेंबर २०१५

तिथी
 आश्विन वद्य ११ (१३:४७) 
वार
 शनिवार
नक्षत्र
 उत्तराफाल्गुनी (२९:०३)
योग
 वैधृति (२६:५३)
करण
 कौलव (२७:१०)

रमा एकादशी

या एकादशीस 'रमा' म्हणतात. हिच्या व्रतेकरून सर्व पापांचे क्षालन होते.

वसुबारस / गोवत्स द्वादशी / वछबाँछ

आश्‍विन वद्य द्वादशीला हे व्रत करतात. यासाठी प्रदोषव्यापिनी तिथी मानली जाते. जर दोन्ही दिवस प्रदोषव्यापिनी असेल अगर दोन्ही दिवस नसेल, तर
'वत्सपूजा वटश्‍चैव कर्तव्ये प्रथमेऽदिने'
यानुसार व्रत पहिल्याच दिवशी करतात. संध्याकाळी गाई चरून आल्यानंतर तुल्य रंगाच्या गायवासरांची गंधादी उपचारांनी पूजा करून-
'क्षीरोदार्णवसंभुते सुरासुर नमस्कृते ।
सर्वदेवमये मातर्गृहाणार्घ्यं नमोस्तु ते ।'
हा मंत्र म्हणून पुढील पायावर अर्घ्य द्यावे आणि
'सर्वदेवमये देवि सर्वदेवैऽरलंकृते ।
मातर्ममाभिलषितं सफलं कुरु नंदिनी ।'
अशी प्रार्थना करावी. महत्त्वाची एक गोष्ट आहे की, त्या दिवशीच्या जेवणात गाईचे दूध, दही, तूप, ताक, खीर, तसेच तेलात तळलेली भजी इ. पदार्थ असू नयेत.
या तिथीला 'वसुबारस' असेही म्हणतात. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून हे व्रत करतात. सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गाईची पूजा करतात व पुढील मंत्राने तिची प्रार्थना करता -
'तत: सर्वमये देयि सर्वदेवैरलङ्‌कृते ।
मतर्ममाभिलषितं सफलं कुरु नंदिनि ॥'
या दिवशी तेला-तुपात तळलेले पदार्थ खात नाहीत. गाईचे दूध, तूप, ताक खात नाहीत. गाईला उडदाचे वदे, भात, गोडधोड पदार्थ खाऊ घालतात. उत्तर प्रदेशात या व्रताला 'वछबाँछ' असे म्हणतात.
समुद्रमंथनात पाच  कामधेनु उत्पन्न झाल्या. त्यातील नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे

मृत्यू योग

२९:०३ नंतर शनिवारी हस्त नक्षत्र असल्यामुळे होणारा मृत्यू योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त



यमघंट योग

२९:०३ नंतर शनिवारी हस्त नक्षत्र असल्यामुळे होणारा यमघंट योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.

रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment