Monday, 9 November 2015

दिनविशेष - १५ नोव्हेंबर २०१५

तिथी
 कार्तिक शुद्ध ४ (२६:३६) 
वार
 रविवार
नक्षत्र
 मूळ (१९:३९)
योग
 धृति (२७:२४)
करण
 वाणिज (१४:३४)

विनायक चतुर्थी

या चतुर्थीला 'स्कंद चतुर्थी' म्हणतात. या दिवशी गणेशबंधू षडाननाने देव-दानव यांच्या युद्धात जय प्राप्त व्हावा म्हणून श्रीगणेशाचे व्रतपूर्वक पूजन केले. त्यास लाल कमळे वाहिली. त्यावेळी प्रसन्न होऊन गणेशाने त्याला त्या युद्धात यशस्वी होण्याचा वर दिला व आपले मयूर वाहन देऊन ही चतुर्थी तुझ्या नावे होईल, असा वर दिला.

एकानंगा पूजा

हे एक स्त्रीव्रत आहे. एकानंगा हे एकानंशेचे दुसरे नाव आहे. कार्तिक शुद्ध चतुर्थी, अष्टमी, नवमी किंवा चतुर्दशी या तिथीस हे व्रत करतात. चतुर्दशीच्या दिवशी पूजा करायची, ती एक फलित वृक्षाखाली करतात व तिला अन्नाचा महानैवेद्य दाखवितात. मग त्या अन्नातला उत्कृष्ट अंश देवीला पोचविण्याबद्दल बहिरी ससाण्याची किंवा दुसर्‍या एखाद्या पक्ष्याची प्रार्थना करतात, या व्रताचा विशॆष हा की, या दिवशी पतीच्या अगोदर पत्‍नी भोजन करते.

भद्रा


१४:३४ नंतर २६:३६ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment