Sunday, 12 June 2016

दिनविशेष - १३ जून - २०१६


तिथी
 जेष्ठ शुक्ल ९ (२८:५७)  
वार
 सोमवार
नक्षत्र
 उत्तराफाल्गुनी (१४:१६)
योग
 व्यतीपात (२९:१२)
करण
 बालव (१५:४६)

महेश नवमी

जेष्ठ शुद्ध नवमीस महेश नवमी असेही म्हणतात.
यादिवशी भगवान श्री शंकर आणि मत पार्वती यांचे पूजन केले जाते. महेश्वरी समाजाची निर्मिती या दिवसापासून झाली अशी मान्यता आहे. त्यामुळे महेश्वरी समाजात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

महेश नवमी कथा

माहेश्वरी समाजाचे पूर्वज क्षत्रिय वंशाचे होते. एकदा शिकार करीत असताना त्यांच्या शिकारीमुळे ऋषींच्या यज्ञात विग्घ्न उत्त्पन्न झाले. त्यामुळे त्या ऋषींनी शाप दिला कि "तुमच्या वंशाचा नाश होईल". माहेश्वरी समाजाला हा शाप लागला होता. मात्र जेष्ठ शुक्ल नवमीच्या दिवशी भगवान श्री शाकारांच्या कृपेने ते शापमुक्त झाले तर झालेच आणि शंकरांनी या समाजाला आपले नाव पण दिले. तेव्हापासून हा समाज "महेश्वरी" या नावाने ओळखला जातो. भगवान श्री शंकरांच्या आज्ञेनुसार माहेश्वरी समाजाने क्षत्रिय कर्म सोडून वैश्य कर्म करायला सुरवात केली.

उमाब्राह्मणी


ज्येष्ठ शुक्ल नवमी दिवशी उपवास करावा. ब्राह्मणी नावाने ख्यात गौरवर्णीय पार्वतीची भक्तिभावाने पूजा करावी. ब्राह्मण व ब्राह्मणकन्येला दूधभाताचे जेवण घालावे व रात्री स्वतः भोजन करावे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

No comments:

Post a Comment