तिथी
|
जेष्ठ शुक्ल ८ (२६:४०)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
पूर्वाफाल्गुनी (११:३६)
|
योग
|
सिद्धि (२८:२९)
|
करण
|
विष्टी (१३:४०)
|
दुर्गाष्टमी
प्रत्येक
महिन्यातील शुक्ल अष्टमीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी दुर्गामातेचे पूजन
शुभ मानले जाते.
निंदुकाष्टमी
या व्रताचा आरंभ
ज्येष्ठ शुक्ल अष्टमीला करुन ते वर्षभर करतात. या व्रतात
पहिले चार महिने विष्णूचे कमलांनी पुढील चार महिने धोत्र्याच्या फुलांनी आणि
शेवटचे चार महिने शतपत्रांनी (दिवसा उमलणार्या कमळांनी ) पूजा करतात.
फल-विष्णुलोकाची प्राप्ती.
शिवपूजा
ज्येष्ठ शुक्ल वा कृष्ण अष्टमी दिवशी श्रीशंकराची व फक्त शुक्ल अष्टमीला शुक्लादेवीची यथाविधी पूजा करावी. शुक्लादेवीने
या दिवशी दानवांचा संहार केला म्हणून देवतांनी तिची पूजा केली होती. म्हणून
संकटमुक्त होण्यासाठी हे व्रत करावे.
भद्रा
१३:४० पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment