तिथी
|
जेष्ठ कृष्ण ३ (१७:०५)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
उत्तराषाढा (९:०९)
|
योग
|
ऐंद्र (६:५०), वैधृति (२९:३०)
|
करण
|
बव (२८:५१)
|
संकष्ट चतुर्थी
पुणे चंद्रोदय: २१:३३
ही चतुर्थी 'विनायक चतुर्थी' म्हणून प्रसिद्ध
आहे. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा . गाईच्या दुधाचा आहार करावा. सायंकाळी
गणपतीचे षोडशोपचार पूजन करुन त्यास तांबडे फूल व दूर्वा वाहाव्यात आणि
चंद्रोदयानंतर नैवेद्य दाखवून ब्राह्मणभोजनोत्तर आपण उपवास सोडावा. या योगे
संकटनाश होऊन सिद्धी प्राप्त होतात. नल राजा या व्रताच्या आचरणाने पुण्यश्लोक
बनला. तसेच , एक चांडाल अनायासे घडलेल्या व्रताच्या प्रभावाने
स्वानंदलोकी गेला.
भद्रा
१७:०५ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक
चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment