Monday, 27 June 2016

दिनविशेष - २८ जून - २०१६



तिथी
 जेष्ठ कृष्ण ८ (१०:४८)  
वार
 मंगळवार
नक्षत्र
 उत्तराभाद्रपदा (७:०४), रेवती (२९:३८)
योग
 शोभन (१८:४०)
करण
 तैतिल (२१:४२)

अमृत योग

२९:३८ नंतर मंगळवारी अश्विनी नक्षत्र असल्यामुळे गृह प्रवेशास वर्ज असणारा अमृतसिद्धि योग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो. 
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज

शुक्र दर्शन

९ मे ला पूर्व दिशेला अस्तंगत झालेल्या शुक्राचे आज पासून सूर्यास्तानंतर काळी काळ पश्चिमेकडे दर्शन होईल.
ग्रहांचे सूर्य सानिध्यामुळे अदर्शन होते. यालाच ‘अस्त’ असे म्हणतात. आणि तोच ग्रह सूर्यापासून ठराविक अंतारावर गेला कि त्याचे दर्शन आपल्याला पूर्वेस अथवा पश्चिमेस होऊ लागते. त्याला ‘उदय’ असे म्हणतात.
सूर्यापासून प्रत्येक ग्रह जितक्या अंशावर असता आपल्याला त्याचे दर्शन होऊ शकते म्हणजेच ग्रहाचा उदय होतो, त्याला त्या ग्रहाचे ‘कालांश’ असे संबोधतात.
शुक्राचे कालांश ८ अंश आहेत.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment