तिथी
|
जेष्ठ शुक्ल १३ (१४:०३)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
अनुराधा (२८:१४)
|
योग
|
सिद्ध (८:४५)
|
करण
|
गरज (२६:५१)
|
शिवराज्याभिषेकोत्सव दिन
जेष्ठ शुक्ल त्रयोदशी दिवशी
शिवराज्याभिषेकोत्सव दिन साजरा केला जातो.
रयतेच्यायास्वतंत्र
सार्वभौम राज्याला बळकटी देण्याच्या उद्देशाने राजधानी रायगडावर शिव राज्याभिषेक
झाला. मराठी संस्कृती विकासासाठी अनेक महत्वाचे निर्णय राज्याभिषेक दिनानिमित्त
जाहीर केले. आपल्या स्वतंत्र राज्याची शिवशक(राज्याभिषेक शक) ही नवी
कालगणना सुरु केली. आर्थिक व्यवहारासाठी शिवराई व होन अशी मराठी
लिपीतील नाणी चलनात आणली. मराठी भाषेतील अनेक महत्वपूर्ण ग्रंथ निर्माण करून
घेतले. परकियांच्या तावडीतून सोडविलेल्या गडकोट किल्ल्यांना पूर्वीची मराठी नवे
दिली. एवढ्यावरच न थांबता आपल्या लोककल्याणकारी स्वतंत्र राज्याचा विचार महाराष्ट्रापुरताच
मर्यादित न ठेवता,संपूर्णभारतात आणि जगभर पोहोचविण्यासाठी
राज्याभिषेकानंतर परकीय सत्ताधीशांविरूढ मोहिमांचा धडका सुरु केला.
शिवशक आरंभ
शिव शक ३४३ आरंभ होत आहे.
दुर्गंधी-दुर्भाग्यनाशक व्रत
ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीला
कोणत्याही पवित्र नदीवर जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन करावे व त्या ठिकाणचा पांढरा
धोतरा, लाल कणेरी आणि सपुष्प निंबाचे गंधफूल लावून पूजन करावे. ही
तीन्ही झाडे सूर्यनारायणाला फार प्रिय आहेत, म्हणून यांचे पूजन करतात.
घबाड
१४:०३ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: मृग
चंद्र
नक्षत्र : अनुराधा
तिथी: १३
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १३
१३
x ३ = ३९
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १३ तिथी
मिळवू : ३९ + १३ = ५२
आता
७ ने भागू ५२ / ७ = ७ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment