Thursday, 9 June 2016

दिनविशेष - १० जून - २०१६


तिथी
 जेष्ठ शुक्ल ६ (२३:३६)  
वार
 शुक्रवार
नक्षत्र
 आश्लेषा (८:०५)
योग
 हर्षण (२७:४०)
करण
 कौलव (११:१७)

घबाड

८:०५ नंतर २३:३६ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: मृग
चंद्र नक्षत्र : मघा
तिथी: ६
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६ x ३ = १८
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता ७ ने भागू  २४ / ७ = ३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

मृत्युयोग

०८:०५ पर्यंत शुक्रवारी आश्लेषा नक्षत्र असल्यामुळे होणारा मृत्यु योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त

हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो. असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने वंग प्रांतात पहिला जातो. 

२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष रहात नाही.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

1 comment:

  1. अरण्यषष्ठी
    ---------
    ज्येष्ठ शुक्ल षष्ठी हे तिथीव्रत आहे.
    ज्येष्ठे मासे सिते पक्षे षष्ठी चारण्यसंज्ञिता ।
    व्यजनैक करास्तस्यामटन्ति विपिने स्त्रियाः ।'
    तां विन्ध्यवासिनीं स्कन्दषष्ठीमाराधयन्ति च ।
    कन्दमूलफलाहारा लभन्ते संतति शुभाम् ॥
    अर्थ- ज्येष्ठ शुक्ल षष्ठीला अरण्यषष्ठी असे नाव आहे. तिला स्कन्दषष्ठी असेही म्हणतात. त्या दिवशी सुवासिनी हातात पंखा घेऊन वनात हिंडतात. कंद-मुळे-फळे खाऊन उपास करतात व विंध्यवासिनीची पूजा करतात. अपत्यप्राप्तीसाठी हे व्रत आहे.
    राजस्थानातल्या स्त्रिया हे व्रत करतात व त्या दिवशी अरण्यात जाऊन अपत्यप्राप्तीसाठी विशिष्ट वनस्पती खातात. यासारखा आणि याच हेतूने प्राचीन ड्‍रुइडिक (Druidic) लोक एक सण पाळीत आणि त्याची तिथीही षष्ठी हीच असे.

    ReplyDelete