तिथी
|
जेष्ठ शुक्ल ३ (२४:५०)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
आर्द्रा (८:४६)
|
योग
|
गंड (९:४४)
|
करण
|
तैतिल (१३:४५)
|
रवि मृग नक्षत्र प्रवेश
रवि
२३:५६ ला मृग नक्षत्रात प्रवेश करत आहे. रविचे मृग नक्षत्र ते हस्त नक्षत्र संक्रमण
हा काळ भारतात पावसाळ्याचा मुख्य काळ समाजाला जातो.
रवि
चे नक्षत्र :
मृग
चंद्र
नक्षत्र: पुनर्वसु
वाहन बेडूक
रवि
नक्षत्र प्रवेशाच्या वेळी चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे यावरून वाहन ठरते. सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत मोजावे, त्यास ९ ने भागून बाकी किती राहते
त्याप्रमाणे वाहन ठरते.
बाकी
|
वाहन
|
पर्जन्य वृष्टीचे स्वरूप
|
१
|
घोडा
|
पर्वतावर पाऊस पडेल
|
२
|
कोल्हा
|
पाऊस पडणार नाही.
|
३
|
बेडूक
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
४
|
मेंढा
|
पाऊस पडणार नाही.
|
५
|
मोर
|
अल्पवृष्टी होईल.
|
६
|
उंदीर
|
अल्पवृष्टी होईल.
|
७
|
महिष
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
८
|
गाढव
|
अल्पवृष्टी होईल.
|
० / ९
|
हत्ती
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
रवि
चे नक्षत्र :
मृग
चंद्र
नक्षत्र: पुनर्वसु
अंतर
: ३
३
ला ९ ने भागले असता बाकी राहते ३. म्हणून वाहन बेडूक आहे. याचाच अर्थ रवि मृग नक्षत्रात
असताना भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
नक्षत्रसंज्ञा : सूर्य-चंद्र
सूर्य नक्षत्रे
|
रोहिणी, मृग, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा,
जेष्ठा, मूळ, धनिष्ठा, शततारका, उत्तराभाद्रपदा
|
चंद्र नक्षत्रे
|
अश्विनी, भरणी, कृत्तिका, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा,
पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, पूर्वा भाद्रपदा, रेवती
|
दोन्ही सूर्य नक्षत्रे
|
वारा सुटेल
|
दोन्ही चंद्र नक्षत्रे
|
पाऊस पडणार नाही
|
एक चंद्र व दुसरे सूर्य
|
पाऊस पडेल
|
रवि नक्षत्र : मृग = सूर्य नक्षत्र
चंद्र नक्षत्र : पुनर्वसु = चंद्र नक्षत्र
एक सूर्य व दुसरे चंद्रनक्षत्र आहे. याचा अर्थ रवि मृग नक्षत्रात असताना चांगला पाऊस पडेल.
स्त्री-पुरुष-नपुंसक
नक्षत्रे : पुरुष-स्त्री
स्त्री नक्षत्रे
|
आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा,
मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती
|
पुरुष नक्षत्रे
|
अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी,
मृग, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा
,उत्तराभाद्रपदा, रेवती
|
नपुंसक नक्षत्रे
|
विशखा, अनुराधा, जेष्ठा
|
सूर्य
नक्षत्र स्त्री संज्ञक व चंद्र नक्षत्र नपुंसक : वारे सुटून वृष्टी मध्यम होईल
स्त्री
पुरुष असा योग असेल तर: वृष्टी समाधान कारक होईल.
रवि नक्षत्र : मृग = पुरुष नक्षत्र
चंद्र नक्षत्र : पुनर्वसु = स्त्री नक्षत्र
एक
स्त्री नक्षत्र तर दुसरे पुरुष नक्षत्र आहे. त्यामुळे रवि मृग नक्षत्रात असताना
समाधानकारक पर्जन्यवृष्टी होईल.
पावसाचा
अंदाज घेताना या बरोबरच रविच्याच्या नक्षत्र प्रवेशाची कुंडली मांडून त्यातील ग्रह
स्थिती लक्षात घेणे देखील अत्यावश्यक आहे.
रंभा
व्रत
या व्रतासाठी ज्येष्ठ शुक्ल तृतीया पूर्वाविद्धा प्रशस्त मानली आहे. त्या
दिवशी सकाळी स्नानादी नित्यकर्मे आटोपून पुर्वाभिमुख बसावे. आपल्या पाठीमागे
गार्हपत्य, दक्षिणाग्नी, सभ्य, आहवनीय व भास्कर या पाचही अग्नींना प्रज्वलित करावे. त्यामध्ये बसून
आपल्यापुढे पद्मासनावर बसलेली , सर्वप्रकारच्या आभूषणांनी युक्त जटाजूट व मृगचर्म धारण करणारी देवीची चतुर्भुज
मूर्ती स्थापन करावी. नंतर
‘ ॐ महकाल्ये नमः , महालक्ष्म्यै नमः महासरस्वत्यै नमः'
आदी नाममंत्राने महानिशा, महामाया, महादेवी , महिषनाशिनी, गंगा, यमुना, सिंधू, शतद्रू, नर्मदा आणि वैतरणीसह सर्वाची पूजा करावी. याच नावाच्या 'नमः' च्या जागी 'स्वाहा' उच्चारून १०८ आहुती
द्याव्यात. मग नाना परिमलयुक्त फुले, फळे, नैवेद्य अर्पण करावा.
त्वं शक्तिस्तवं स्वधा स्वाहा त्वं सावित्री सरस्वति ।
पतिं देहि गृहं देहि सुतान् देहि नमोस्तुऽ ते ॥ '
या मंत्राने प्रार्थना करावी. व्रत करणार्या स्त्रीला सुख, समृद्धी, पुत्रादि मनोरथ पूर्ण
होतात. आईच्या सांगण्यावरुन हे व्रत पार्वतीने केले होते.
मुस्लीम रमजान मासारंभ
मुस्लीम कालगणनेनुसार रमजान
मास आरंभ होत आहे.
मुस्लिम दिनदर्शिकेनुसार रमजान-उल मुबारकचा मुकद्दस महिना नववा असतो. प्रत्येक
वर्षाच्या या महिन्यात रोजा ठेवला जातो. एक महिन्यापर्यंत सर्व मुस्लिम बांधव रोजा
ठेवतात. प्रत्येक घरातील लहान थोर मंडळी रोजा करतात.
अशी मान्यता आहे कि, या शुभ महिन्यात स्वर्गाचे दरवाजे उघडले जातात आणि वाईट प्रवृत्तीला कैद केले
जाते. दया आणि प्रामाणिकतेची सुरवात या महिन्यापासून होते. त्यामुळे प्रत्येक
मुसलमान या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो. रमजान हजरत मोहम्मद सल्लल्लाह
अलैहवसल्लमच्या उम्मतचा महिना आहे. या महिन्यात रोजे ठेवणार्यांना खूप पुण्य
मिळते आणि याच दिवसात जो मुसलमान मनापासून खुदा-अल्ला तालाची इबादत आणि कलामपाकची
तिलावत करतो त्याची आजपर्यत केलेली सर्व पापं धुतली जातात.
यमघंट योग
८:४६ पर्यंत मंगळवारी
आर्द्रा नक्षत्र असल्यामुळे होणारा यमघंट योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व
शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
|
सोमवार – विशाखा
|
मंगळवार – आर्द्रा
|
बुधवार – मूळ
|
गुरुवार – कृत्तिका
|
शुक्रवार – रोहिणी
|
शनिवार – हस्त
|
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment