Saturday, 4 June 2016

दिनविशेष - ५ जून - २०१६


तिथी
 वैशाख अमावास्या (०८:३०), जेष्ठ शुक्ल १ (९:२६)  
वार
 रविवार
नक्षत्र
 रोहिणी (१२:३६)
योग
 धृति (१६:१३)
करण
 किंस्तुग्घ्न (१८:५५)

करिदिन

भावुका अमावास्येचा दुसरा दिवस म्हणून हा करिदिन आहे. ग्रहण दिवस, होळी, आयन दिन (उत्तरायण आणि दक्षिणायनाचा दिवस), भावुका अमावास्या व प्रेतदाहविधीचा दिवस अशा ५ प्रकारच्या दिवसांच्या दुसऱ्या दिवसाला करिदिन म्हणतात. हे ५ दिवस व त्यापुढचा म्हणजे करिदिन सर्व शुभ कार्याला वर्ज समजले जातात.

क्षयतिथी

ज्या तिथीला कोणताही सूर्योदय होत नाही ति क्षय तिथी असते.
लागोपाठच्या दोन सूर्योदयाच्या वेळी एकचतिथी असेल तर तिला तिथी वृद्धी म्हणतात.
क्षय तिथी, वृद्धी तिथी, कृ. १३, कृ १४, अमावास्या व शु. १ या सहा तिथी शुभ कार्यासाठी पूर्णपणे अशुभ सांगितलेल्या आहेत.

दशहरा आरंभ

जेष्ठ शुक्ल प्रतिपदेपासून दशमी पर्यंत दहा दिवस दशहरा साजरा करतात. गंगास्नान, गंगा पूजन, गंगास्त्रोत्र पठण, दान होम यापैकी शक्य ते करावे. शरीर, वाणी व मन यांचे कडून कळत-नकळत होणारी दहा पापे नष्ट होतात. ०८:३० नंतर दशहरा आरंभ होत आहे.  

धनिष्ठा नवक समाप्ति

वैशाख कृष्ण पक्षातील धनिष्ठा नक्षत्रापासून रोहिणी नक्षत्रा पर्यंत ९ दिवसाच्या कालावधील धनिष्ठा नवक असे संबोधतात. यालाच महापंचक असेही म्हणतात. १२:३६ ला रोहिणी नक्षत्र आणि म्हणूनच धनिष्ठा नवक समाप्त होत आहे.

इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.

यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

No comments:

Post a Comment