Thursday, 9 June 2016

दिनविशेष - ९ जून - २०१६


तिथी
 जेष्ठ शुक्ल ५ (२३:१०)  
वार
 गुरुवार
नक्षत्र
 पुष्य (७:३०)
योग
 व्याघात (२८:१२)
करण
 बव (११:१६)

गुरुपुष्यांमृत

सूर्योदयापासून सकाळी ७:३० पर्यंत गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे संचयासाठी शुभ असणारा गुरुपुष्यांमृत योग होत आहे. हा योग विवाहा साठी वर्ज आहे.
हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो. 
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज


दग्धयोग

२३:१० नंतर गुरुवारी षष्ठी तिथी असल्यामुळे दग्धयोग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.

रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

No comments:

Post a Comment