Wednesday, 26 December 2018

दिनविशेष - २९ डिसेंबर २०१८




तिथी
मार्गशीर्ष कृष्ण ८ (२६:२७)
वार
शनिवार
नक्षत्र
उत्तराफाल्गुनी (९:००)
योग
सौभाग्य (९:१०), शोभन (३०:५६)
करण
बालव (१५:०४),  कौलव (२६:२७)


कालाष्टमी

प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी शिव पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.

अनघा व्रत

एक तिथिव्रत. मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीस गोमयाने पवित्र केलेल्या वेदीवर अनघ व अनघा या नावांनी दोन शहाळी स्थापन करून त्यांची पूजा करावी व पुढे एक वर्षपर्यंत प्रत्येक वद्य अष्टमीस हे व्रत चालवून मग त्याची सांगता करावी, असे हेमांद्रीने सांगितले आहे.
फल-पापनाश.

अष्टका-श्राद्ध

मार्गशीर्ष कृष्ण अपराह्न-व्यापिनी अष्टमीच्या दिवशी शास्त्रोक्त विधीने अष्टका-श्राद्ध करावे. ब्राह्मणभोजन घालून त्यांचा तोषवावे, त्यामुळे उत्तम फल मिळते, आणि न केल्यास दोष लागतो.

रुक्मिणी अष्टमी

मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीच्या दिवशी कृष्ण, रुक्मिणी व प्रद्युम्न यांच्या सुवर्णाच्या मूर्ती करून त्यांचे सुगंधी जलाने आणि गंधादीने पूजन करावे. नैवेद्याला उत्तम पदार्थ अर्पण करावेत आणि सामर्थ्य असल्यास आठ सुवासिनीना चांगली वस्त्रे देऊन दक्षिणा द्यावी. यामुळे रुक्मिणीची प्रसन्नता मिळते.

रवि पूर्वाषाढा नक्षत्र प्रवेश

११:२६ ला रवि पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश करीत आहे.

दग्ध योग

२६:२७ नंतर शनिवारी नवमी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


मृत्यू योग

९:०० नंतर शनिवारी हस्त नक्षत्र मृत्यूयोग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त

हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो. असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो. 
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष रहात नाही.

यमघंट योग

९:०० नंतर शनिवारी हस्त नक्षत्र असल्यामुळे असल्यामुळे यमघंट योग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त


यमघंट योगावर जन्म झाल्यास बालकाला कष्ट होतात. (शांती केल्यास हे कष्ट नष्ट होतात.)
यमघंट योगावर प्रयाण केले असता मृत्यू
ग्रहप्रवेश केला असता कुलक्षय
देवास्थापाना केली असता मृत्यू हि फळे मिळतात.

अष्टमी श्राद्ध

अपराण्ह काळी अष्टमी तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी मार्गशीर्ष कृष्ण ८ असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment