Thursday, 6 December 2018

दिनविशेष - १० डिसेंबर २०१८


तिथी
मार्गशीर्ष शुक्ल ३ (१७:५०)
वार
सोमवार
नक्षत्र
पूर्वाषाढा (१०:३७)
योग
वृद्धि (२१:४८)
करण
गरज (१७:५०), वणिज (--:--)

अनंतर्यव्रत

एक स्त्रीव्रत. व्रतारंभ मार्गशीर्ष शुक्ल तृतीयेपासून करतात. प्रत्येक पंधरवड्यातल्या तृतीयेस उपवासपूर्वक उमेची पूजा करणे, हा या व्रताचा विधी आहे. व्रतावधी एक वर्ष.
फल- पतिपुत्रांचा अवियोग.

आनंद तृतीया व्रत

वैशाख, भाद्रपद व मार्गशीर्ष या मासातल्या तृतीयेस ललितादेवीची पूजा करून त्याचबरोबर सुवासिनींचीही पूजा करणे, हा या व्रताचा विधी आहे.

अभीष्ट तृतीया

मार्गशीर्ष शुक्ल तृतीयेस हे व्रत करतात. एक तिथिव्रत. या दिवशी गौरीची पूजा करून अभीष्ट सिद्धीसाठी तिची प्रार्थना करतात.

गिरीतनयाव्रत

मार्गशीर्ष शुक्ल तृतीयेस या व्रताचा आरंभ करतात. प्रत्येक महिन्यात निरनिराळ्या नावांनी व फुलांनी गौरीची पूजा करावयाची असते, असा या व्रताचा विधी आहे.व्रतावधी -एक वर्ष.

नामतृतीया

हे तिथिव्रत आहे. मार्गशीर्ष शुक्ल तृतीयेस या व्रताचा आरंभ करतात. व्रतावधी एक वर्ष. गौरी, काली, उमा, भद्रा, दुर्गा, कांती, सरस्वती, मंगला, वैष्णवी, लक्ष्मी, शिवा, नारायणी या गौरीच्या बारा नावांपैकी एकेका नावाने प्रत्येक महिन्याला तिची पूजा करतात. या व्रताचे आणखी दोन पर्याय आहेत ते असे-
१)      अर्धनारीनटेश्‍वर हे महेश्‍वराचे रूप समजून त्याची पूजा करणे.
२)      केशवापासून दामोदरापर्यंतच्या बारा नावांपैकी एकेका नावाने हरिहराच्या मूर्तीची एकेक महिना पूजा करणे
फल- स्वर्गप्राप्ती.


मृत्यूयोग

१०:३७ नंतर सोमवारी उत्तराषाढा नक्षत्र असल्यामुळे मृत्यूयोग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त

हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो. असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो. 
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष रहात नाही.

तृतीया श्राद्ध

अपराण्ह काळी तृतीया तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी मार्गशीर्ष शुक्ल ३ असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment