Saturday, 15 December 2018

दिनविशेष - १७ डिसेंबर २०१८



तिथी
मार्गशीर्ष शुक्ल ९ (७:२९)
वार
सोमवार
नक्षत्र
रेवती (२८:१७)
योग
वरीयान (२५:०८)
करण
कौलव (७:२९), तैतिल (१९:४९)

धनुर्मासारंभ / झुंझुरमास आरंभ

सूर्य धनु राशीत असे पर्यंत म्हणजे मकर संक्रांती पर्यंत धनुर्मास किंवा झुंझुरमास साजरा करतात. या संपूर्ण कळत दररोज सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून देवाची पूजा करावी . धूतवस्त्र घालून स्वयंपाक करावा. यात तांदूळ व मुगच्या डाळीची खिचडी हा मुख्य पदार्थ असतो. तसेच वांग्याची भाजी व तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी यांचाही समावेश असतो. सूर्यास्त झाल्यावर देवाला व सूर्याला नैवेद्य दाखवून लगेच भोजन करावे.
बहुतांश लोक हा सण फ़क़्त शेवटच्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या आधीच्या दिवशी (भोगी) साजरा करतात.


दशमी श्राद्ध

अपराण्ह काळी दशमी तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी मार्गशीर्ष शुक्ल १० असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment