तिथी
|
मार्गशीर्ष शुक्ल ९
(अहोरात्र)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
उत्तराभाद्रपदा (२७:०८)
|
योग
|
व्यतीपात (२५:४७)
|
करण
|
बालव (--:--), बालव (१८:५७)
|
नंदिनी नवमी
मार्गशीर्ष शुक्ल नवमीला 'नंदिनी नवमी' असे म्हणतात. या दिवसापासून तीन रात्रीपर्यंत देवीची
यथासांग पूजा करावी, म्हणजे अश्वमेध यज्ञाचे फळ मिळ्ते.
कल्पादि
ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभाची जी तिथी असते तिला कल्पादि
असे म्हणतात. पुढील सात तिथी कल्पादि आहेत.
१)
चैत्र - शुक्ल ५,
२)
चैत्र – कृष्ण ५
३)
वैशाख – शुक्ल ३
४)
कार्तिक - शुक्ल ७
५)
मार्गशीर्ष – शुक्ल ९
६)
माघ – शुक्ल १३
७)
फाल्गुन – शुक्ल ३
धर्मसिंधु ग्रंथात चैत्र
कृष्ण ५ न सांगता चैत्र शुक्ल प्रतिपदा सांगितली आहे.
रवि मूळ नक्षत्र प्रवेश
९:०८ ला रवि मूळ नक्षत्रात
प्रवेश करीत आहे.
रवि धनु राशीत प्रवेश
९:०८ ला रवि धनु राशीत
प्रवेश करीत आहे.
रवीच्या धनु राशी
संक्रमणासाठी पुण्यकाल संक्रमणानंतर १६ घटिका असतो. मात्र यामध्ये रात्रीची वेळ घेत नाहीत. म्हणून
पुण्यकाल ९:०८ ते १५:३२ असा आहे. पुण्याकालात स्नान, दान इ. गोष्टी अधिक शुभ
मानल्या आहेत.
सामुदायिक
मुहूर्त ४५ म्हणजे समर्घ आहे. रविच्या राशी संक्रमाणाच्या वेळी असणाऱ्या चंद्र
नक्षत्रावरून ३ प्रकारचे सामुदायिक मुहूर्त होतात. ते व त्यांची फळे पुढील
प्रमाणे:
·
१५ : महर्ग / जघन्य : फळ = तेजी
·
३० : साम्यार्घ : फळ = सम
·
४५ : समर्घ : फळ = मंदी
नवमी श्राद्ध
अपराण्ह काळी नवमी
तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी मार्गशीर्ष शुक्ल ९ असेल तर या
दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment