Thursday, 6 December 2018

दिनविशेष - ९ डिसेंबर २०१८


तिथी
मार्गशीर्ष शुक्ल २ (१५:४१)
वार
रविवार
नक्षत्र
मूळ (८:०७)
योग
गंड (२१:१२)
करण
कौलव (१५:४१), तैतिल (२८:४२)


अतियोगव्रत

हे एक तिथिव्रत आहे. हे केवळ स्त्रियांसाठी आहे. मार्गशीर्ष शुक्ल द्वितीयेपासून या व्रताचा प्रारंभ होतो. तांदळाच्या पिठाच्या शिवगौरीच्या प्रतिमा बनवून त्यांची पूजा व पायस-भोजन असा याचा विधी आहे. व्रतावधी एक वर्ष असतो. प्रत्येक महिन्यात या तिथीस वेगवेगळ्या नावांनी व पुष्पांनी पूजा करतात.

पितृपूजन

मार्गशीर्ष शुक्ल द्वितीयेला पितृपूजन करून व्रत केल्याने पितृगण संतुष्ट होतात आणि न केल्याने ते दुःखी होतात अशी मान्यता आहे.

मु. रबिलाखर मासारंभ

मुस्लीम कालगणनेनुसार रबिलाखर मास आरंभ होत आहे.

द्वितीया श्राद्ध

अपराण्ह काळी द्वितीया तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी मार्गशीर्ष शुक्ल २ असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment