Monday, 29 February 2016

दिनविशेष - २ मार्च २०१६

तिथी
 माघ कृष्ण ८ (१७:२०) 
वार
 बुधवार     
नक्षत्र
 जेष्ठा (२८:२०)
योग
 वज्र (३०:३७)
करण
 तैतिल (२९:४८)

अष्टका श्राद्ध

धर्मसिंधु नुसार षण्णवती म्हणजे एकूण ९६ श्राद्धे सांगितली आहेत. ती पुढीलप्रमाणे :
अमावास्या
१२
युगादि
मन्वादि
१४
संक्रांति
१२
वैधृती
१२
व्यतिपात
१२
महालय
१५
अष्टका
अन्वष्टका
पूर्वेद्यु
एकूण
९६

यमघंट योग

२८:२० नंतर बुधवारी मूळ नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त




संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

दिनविशेष - १ मार्च २०१६

तिथी
 माघ कृष्ण ७ (१५:५२) 
वार
 मंगळवार     
नक्षत्र
 अनुराधा (२६:३७)
योग
 हर्षण (३०:५३)
करण
 बालव (२८:४१)

कालाष्टमी

प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी शिव पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.

पूर्वेद्यु: श्राद्ध

धर्मसिंधु नुसार षण्णवती म्हणजे एकूण ९६ श्राद्धे सांगितली आहेत. ती पुढीलप्रमाणे :
अमावास्या
१२
युगादि
मन्वादि
१४
संक्रांति
१२
वैधृती
१२
व्यतिपात
१२
महालय
१५
अष्टका
अन्वष्टका
पूर्वेद्यु
एकूण
९६

घृतकंबलदान

हे व्रत माघ महिन्यातील कोणत्याही अष्टमीस वा चतुर्दशीस करतात. पांढर्‍या किंवा काळ्या गाईचे घट्ट तूप शिवलिंगावर माखणे व त्याचे दान देणे.
दानाचा विधी:  
प्रथम संकल्प करून शिवाची पूजा करतात व शिवलिंगावर तूप थापतात. नंतर तीळ, मोहर्‍या, बेलाची पाने या वस्तू देवला वाहतात. शेवटी
'शिवाय नम:'
या मंत्राचा यथाशक्‍ती जप करतात. मग ते माखलेले तूप दान देतात. रात्री जागरण करतात. प्रात:काळी स्नान झाल्यावर पुनश्‍च शंकराची पूजा करून शिवभक्‍तांना भोजन घालतात. स्वत: भोजन करून व्रतसमाप्ती करतात.

फल - दारिद्र्यनाश, सुखोपभोगाची प्राप्ती व शिवलोकाची प्राप्ती.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Monday, 22 February 2016

दिनविशेष - २९ फेब्रुवारी २०१६

तिथी
 माघ कृष्ण ६ (१३:४८) 
वार
 सोमवार     
नक्षत्र
 विशाखा (२४:१७)
योग
 व्याघात (३०:३९)
करण
 विष्टि (२६:५४)

यमघंट योग

२४:१७ पर्यंत सोमवारी विशाखा नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त



भद्रा


१३:४८ नंतर २६:५४ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

दिनविशेष - २८ फेब्रुवारी २०१६

तिथी
 माघ कृष्ण ५ (११:२१) 
वार
 रविवार     
नक्षत्र
 स्वाती (२१:३०)
योग
 ध्रुव (३०:०२)
करण
 गरज (२४:३७)

सर्वसामान्य दिवस

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

दिनविशेष - २७ फेब्रुवारी २०१६

तिथी
 माघ कृष्ण ४ (८:४३) 
वार
 शनिवार     
नक्षत्र
 चित्रा (१८:२७)
योग
 वृद्धि (२९:१०)
करण
 कौलव (२२:०३)

घबाड

८:४३ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: शततारका
चंद्र नक्षत्र : चित्रा
तिथी: १५ + ४ = १९
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८ x ३ = ५४
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १९ तिथी मिळवू : ५४ + १९ = ७३
आता ७ ने भागू  ७३ / ७ = १० ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

वृद्धीतिथी

ज्या तिथीला कोणताही सूर्योदय होत नाही ति क्षय तिथी असते.
लागोपाठच्या दोन सूर्योदयाच्या वेळी एकचतिथी असेल तर तिला तिथी वृद्धी म्हणतात.

क्षय तिथी, वृद्धी तिथी, कृ. १३, कृ १४, अमावास्या व शु. १ या सहा तिथी शुभ कार्यासाठी पूर्णपणे अशुभ सांगितलेल्या आहेत.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

दिनविशेष - २६ फेब्रुवारी २०१६

तिथी
 माघ कृष्ण ४ (अहोरात्र) 
वार
 शुक्रवार     
नक्षत्र
 हस्त (१५:२२)
योग
 गंड (२८:१२)
करण
 बव (१९:२३)

संकष्टी चतुर्थी

(पुणे चंद्रोदय : २१:३६)
श्रीगणपतीच्या व्रतांपैकी हे दर महिन्यास येणारे एक संकटनाशक, महासिद्धिदायक असे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या वद्य पक्षात जी चतुर्थी असते, त्या चतुर्थीस 'संकष्टी -चतुर्थी ' असे म्हण्तात. या दिवशी दिवसभर उपवास करावयाचा असतो. रात्रौ चंद्रदर्शनानंतर गणपतीची षोडशोपचारे पूजा करावी व त्यानंतर चंद्राची पूजा करुन त्याला व चतुर्थी तिथीला अर्घ्य द्यावे, अशी पद्धत आहे. श्रीगणपती ही विघ्ननाशक देवता असल्याने हा या व्रतप्रभावाने ती प्रसन्न होते आणि सर्व विघ्नांचा नाश होतो, असे महात्म्य आहे. या दिवशी चंद्रदर्शनानंतर चंद्राची पूजा करुन पारणे करावयाचे असते; हे ह्या व्रताचे मुख्य अंग आहे. या दिवशी संध्याकाळी आंघोळ करुन श्रीगणपतीच्या पूजेची तयारी करून घ्यावी. पुजास्थानी घरातील गणेशमूर्ती असेल तर ती ठेवावी. नसल्यास सुपारी अक्षतापुंजावर ठेवून तिची गणपती म्हणून पूजा करावी. अथर्वशीर्षाची २१ आवर्तने करावीत. पूजा षोडशोपचारांनी पंचामृतअभिषेकासह करावी. आवर्तनाच्या प्रत्येक वेळी
'श्रीविघ्नविनायकदेवताभ्यो नमः '
असे म्हणावे. प्रारंभी संकल्प करताना 'अमुक संकटनाशनार्थ' असे म्हणून त्या संकटाचा उल्लेख करावा.चंद्राला अर्घ्य द्यावा. त्याच्या दिशेने गंध, फूल,अक्षता उडवाव्या व नमस्कार करावा. चतुर्थी तिथीला अर्घ्य ताम्हनात द्यावा व शेवटी महानैवेद्य दखवून पारणे करावे. कथा ऐकावी. यायोगे सर्व संकटाचा नाश होतो, व गणेशकृपा होते, असा अनुभव आहे.

घबाड

१५:२२ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: शततारका
चंद्र नक्षत्र : चित्रा
तिथी: १५ + ४ = १९
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८ x ३ = ५४
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १९ तिथी मिळवू : ५४ + १९ = ७३
आता ७ ने भागू  ७३ / ७ = १० ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

वृद्धीतिथी

ज्या तिथीला कोणताही सूर्योदय होत नाही ति क्षय तिथी असते.
लागोपाठच्या दोन सूर्योदयाच्या वेळी एकचतिथी असेल तर तिला तिथी वृद्धी म्हणतात.

क्षय तिथी, वृद्धी तिथी, कृ. १३, कृ १४, अमावास्या व शु. १ या सहा तिथी शुभ कार्यासाठी पूर्णपणे अशुभ सांगितलेल्या आहेत.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट