Wednesday, 10 February 2016

दिनविशेष - १२ फेब्रुवारी २०१६

तिथी
 माघ शुक्ल ४ (९:१७), माघ शुक्ल ५ (३०:४०) 
वार
 शुक्रवार     
नक्षत्र
 उत्तराभाद्रपदा (९:०७)
योग
 साध्य (२१:२०)
करण
 बव (१९:५७)

वसंत पंचमी

माघ शुक्ल पंचमी दिवशी ( पूर्वविद्धा ) उत्तम अशा चौरंगावर वस्त्र अंथरावे. त्यावर अक्षतांनी अष्टदल कमल काढावे. त्याच्या अग्रभागी गणेश, पृष्ठभागी वसंत (म्हणजे गव्हाची पुंजी - रास ), लोंब्या जलपूर्ण घटात ठेवाव्यत. प्रथम गणेशपूजा व नंतर गव्हाच्या पुंजामध्ये रतिमदनाची पूजा करावी. त्यावर अबीरादी घालून चित्रविचित्र करावे. नंतर

'शुभा रति: प्रकर्तव्या वसंतोज्ज्वलभूषणा ।
नृत्यमाना शुभादेवी समस्ताभरणैर्णुता ॥
वीणावादनशीला च मदकर्पूरचर्चिता ॥'
या मंत्राने रती आणि

'कामदेवस्तु कर्तव्यो रूपेणाप्रतिमो भुवि ।
अष्टबाहु: स कर्तव्य: शंखपद्मविभूषण: ॥
चापबाणकरश्‍चैव मदादंचितलोचन: ।
रति: प्रीतिस्तथाशक्‍तिर्मदशक्‍तिस्तथोज्ज्वला ॥
चतस्त्रस्तस्य कर्तव्या: पत्‍नो रूपमनोहरा: ।
चत्वारस्य करास्तस्य कार्याभार्यास्तनोपग:
केतुश्‍च मकर: कार्य: पंचबाणमुखो महान् ॥'
या मंत्राने कामदेवाचे ध्यान करावे. निरनिराळी फळे, फुले, पत्री आदी वाहून प्रार्थना करावी. यामुळे गार्हस्थ्य-जीवन सुखमय होऊन प्रत्येक कार्यात उत्साह प्राप्त होतो.

रति व कामदेव पूजन

रति कामदेवाचे पूजन करून गीतवादन, नृत्य इत्यादि करमणुकीचे कार्यक्रम करावेत. सामुहिक आनंदोत्सव करावा.

अमृतयोग

९:०७ नंतर शुक्रवारी रेवती नक्षत्र असल्यामुळे होणारा अमृत्सिधी योग होत आहे. हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.  
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज

भद्रा

९:१७ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

क्षयदिन

ज्या तिथीला कोणताही सूर्योदय होत नाही ति क्षय तिथी असते.
लागोपाठच्या दोन सूर्योदयाच्या वेळी एकचतिथी असेल तर तिला तिथी वृद्धी म्हणतात.

क्षय तिथी, वृद्धी तिथी, कृ. १३, कृ १४, अमावास्या व शु. १ या सहा तिथी शुभ कार्यासाठी पूर्णपणे अशुभ सांगितलेल्या आहेत.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
rprachi.blogspot.com

No comments:

Post a Comment