Monday, 22 February 2016

दिनविशेष - २३ फेब्रुवारी २०१६

तिथी
 माघ कृष्ण १ (२५:३२) 
वार
 मंगळवार     
नक्षत्र
 मघा (७:२२)
योग
 सुकर्मा (२५:५७)
करण
 बालव (१२:३८)

गुरुप्रतिपदा

माघ कृष्ण प्रतिपदेला गुरुप्रतीपादा असे म्हणतात.  हा दिवस दत्तभक्तांसाठी विशेष महत्वाचा असतो.
श्रीनृसिंहसरस्वती हे श्रीपाद वल्लभ यांनंतरचे श्रीदत्तात्रेयांचे दुसरे पूर्णावतार मानले जातात. नरसोबाची वाडी, औदुंबर, गाणगापूर येथे त्यांच्या पादुका असून लाखो भक्त सेवेसाठी तेथे जातात. श्रीगुरुचरित्र या ओवीबद्ध ग्रंथात त्यांच्या लीला वर्णिल्या असून हा ग्रंथ दत्तभक्तांचा 'वेद' मानला जातो. त्यांच्यामुळे महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा मोठा प्रसार झाला.
माघ कृष्ण प्रतिपदेला श्री महाराज कर्दळीवन येथे गुप्त झाले. या दिवशी आपले अवतार कार्य संपवून श्री नृसिंहसरस्वती दत्त महाराजांनी कर्दळीवन येथे जाण्यासाठी आपल्या प्रिय शिष्यांना निरोप दिला व अंतर्धान पावले.
शिशिर ऋतु माघमासीं ।  असितपक्ष प्रतिपदेसी ।
शुक्रवारीं पुण्यदिवसीं ।  श्रीगुरु बैसले निजानंदीं ॥॥

श्रीगुरु म्हणती शिष्यांसी । जातों आम्ही निज मठासी ।
पावतां खूण तुम्हांसी । प्रसादपुष्पें पाठवितों ॥॥

गाणगापूर यात्रा ४ दिवस

श्री क्षेत्र गाणगापूर येथील ४ दिवसाची यात्रा आरंभ होत आहे.

इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.

यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment