Monday, 29 February 2016

दिनविशेष - १ मार्च २०१६

तिथी
 माघ कृष्ण ७ (१५:५२) 
वार
 मंगळवार     
नक्षत्र
 अनुराधा (२६:३७)
योग
 हर्षण (३०:५३)
करण
 बालव (२८:४१)

कालाष्टमी

प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी शिव पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.

पूर्वेद्यु: श्राद्ध

धर्मसिंधु नुसार षण्णवती म्हणजे एकूण ९६ श्राद्धे सांगितली आहेत. ती पुढीलप्रमाणे :
अमावास्या
१२
युगादि
मन्वादि
१४
संक्रांति
१२
वैधृती
१२
व्यतिपात
१२
महालय
१५
अष्टका
अन्वष्टका
पूर्वेद्यु
एकूण
९६

घृतकंबलदान

हे व्रत माघ महिन्यातील कोणत्याही अष्टमीस वा चतुर्दशीस करतात. पांढर्‍या किंवा काळ्या गाईचे घट्ट तूप शिवलिंगावर माखणे व त्याचे दान देणे.
दानाचा विधी:  
प्रथम संकल्प करून शिवाची पूजा करतात व शिवलिंगावर तूप थापतात. नंतर तीळ, मोहर्‍या, बेलाची पाने या वस्तू देवला वाहतात. शेवटी
'शिवाय नम:'
या मंत्राचा यथाशक्‍ती जप करतात. मग ते माखलेले तूप दान देतात. रात्री जागरण करतात. प्रात:काळी स्नान झाल्यावर पुनश्‍च शंकराची पूजा करून शिवभक्‍तांना भोजन घालतात. स्वत: भोजन करून व्रतसमाप्ती करतात.

फल - दारिद्र्यनाश, सुखोपभोगाची प्राप्ती व शिवलोकाची प्राप्ती.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment