Monday, 8 February 2016

दिनविशेष - १० फेब्रुवारी २०१६

तिथी
 माघ शुक्ल २ (१४:५२) 
वार
 बुधवार     
नक्षत्र
 शततारका (१३:१५)
योग
 परिघ (७:४४), शिव (२८:१४)
करण
 तैतिल (२५:२८)

मुस्लीम जमादिलावल मासारंभ

मुस्लीम कालगणनेनुसार जमादिलावल मास आरंभ होत आहे

धर्मबीज

माघ महिन्यांतील पुण्यतीथ द्वितीया, जिला धर्मबीज असें म्हणतात.  त्या दिवशीं गोरक्षनाथानें धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दीली. त्या वेळेस सर्व देव बोलाविले होते. नगरवासी लोकांचाहि मोठा मेळा जमला होता. सर्वजण प्रसाद घेऊन आनंदानें आपपल्या स्थानीं गेले. दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी देवांसुद्धां सर्वांनीं आपली इच्छा दर्शविली. मग ' धर्मनाथबीजेचा' उत्सव प्रतिवर्षीं करण्याची गोरक्षानें त्रिविक्रमास आज्ञा दिली. तेव्हां सर्वास आनंद झाला व दरसाल या दिवशीं उत्सव होऊं लागला.
गोरक्षनाथानें आपल्या 'किमयागिरी' नामक ग्रंथांत असें लिहिलें आहे कीं. आपपल्या शक्त्यनुसार जो कोणी हें बीजेचें व्रत करील त्याच्या घरीं दोष, दारिद्र्य, रोग आदिकरुन विघ्नें स्वप्नांत देखील यावयाची नाहींत. त्या पुरुषांचा संसार सुयंत्रित चालेल प्रत्येक्ष लक्ष्मी त्याच्या गृहीं वास्तव्य करील. याप्रमाणें धर्मनाथ बीजेचा महिमा होय.
- श्री नवनाथ भक्तिसार - अध्याय ३४

दग्ध योग

१४:५२ नंतर बुधवारी तृतिया  असल्यामुळे दग्धयोग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.

रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment