तिथी
|
माघ शुक्ल ६ (२८:१७)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
रेवती (७:१३), अश्विनी (२९:३३)
|
योग
|
शुभ (१८:०५)
|
करण
|
कौलव (१७:२७)
|
दारिद्र्यहर षष्ठी
माघ शुक्ल
षष्ठीला या व्रताचा आरंभ करून प्रत्येक षष्ठीला एकभुक्त, नक्त, अयाचित अथवा उपवास करून ब्राह्मणभोजन घालावे आणि वाटीत दूध, तूप,
भात आणि साखर घालून
प्रत्येक षष्ठीला वर्षभर दान करावे म्हणजे त्याच्या कुळावरील दारिद्र्य दूर होईल.
मंदारषष्ठी
हे व्रत तीन
दिवसाचे आहे. यासाठी माघ शुक्ल पंचमी दिवशी संपूर्ण कामनारहित होऊन, जितेंद्रिय राहून एकभुक्त, तेही थोडेसे खाऊन राहावे. षष्ठी दिवशी
प्रात:स्नानादि नित्यकर्मे केल्यानंतर ब्राह्मणांची आज्ञा घेऊन व्रत करावे व
रात्री फक्त मंदारपुष्प भक्षण करून उपवास करावा. त्याप्रमाणे सप्तमी दिवशी सकाळी
ब्राह्मणपूजन करून मंदार (रुई) -वृक्षाची आठ फुले आणावीत व तांब्याच्या पात्रात
तिळांचे अष्टदल कमळ काढावे. त्याच्या प्रत्येक पाकळीवर एकएक फूल ठेवावे व मध्यभागी
सोन्याची सूर्यमूर्ती स्थापावी आणि
'भास्कराय नम:'
म्हणून पूर्व
दिशेकडील,
'सूर्याय नम:'
म्हणून
अग्नेयेकडील,
सूर्याय नम:'
म्हणून
दक्षिणेकडील,
'यज्ञेशाय नम:'
म्हणून
नैऋत्येकडील,
'वसुधाम्ने नम:'
म्हणुन पश्चिमेकडील,
'चंडभानवे नम:'
म्हणुन
वायव्येकडील,
'कृष्णाय नम:'
म्हणुन
उत्तरेकडील आणि
'श्रीकृष्णाय नम:'
म्हणून
ईशान्येकडील अर्क-पुष्पांची स्थापना आणि पूजा करावी. आणि कमल-मध्यातील सूर्यदेवाची
'सूर्याय नम:' म्हणून पूजा करावी. तेल आणि मीठवर्जित भोजन
करावे. याप्रमाणे प्रतिज्ञापूर्वक महिनेच्या महिने प्रत्येक सप्तमीला वर्षपर्यंत
व्रत करून समाप्ती दिवशी घटावर लाल सूर्यमूर्ती स्थापन करून पूजा करावी.
'नमो मंदारनाथाय
मंदारभवनाय च ।
त्वं के
तारयस्वास्मानस्मात् संसारसागरात्'
अशी प्रार्थना
करून सूर्यमूर्ती विद्वान ब्राह्मणाला दान द्यावी. यामुळे सर्व पापांचा नाश होऊन
स्वर्गप्राप्ती होते.
नंदादी विधी
माघ शुक्ल
षष्ठीला रविवार असेल तर 'नंदा' असे म्हणतात. या
दिवशी नक्त करून सूर्यमुर्तीला तुपाने स्नान घालणे आणि अगस्तीची फुले वाहून
त्याची पूजा करणे असा विधी आहे. उद्यापनाच्या वेळी ब्राह्मणांना घारग्याचे भोजन
घालतात.
फल - दु:ख व दारिद्र्य यांचा नाश; धन, सुख, संतती व सूर्यलोक यांची
प्राप्ती.
रवि कुंभ राशीत प्रवेश
१४:२५ ला रवि कुंभ राशीत प्रवेश करत आहे.
रवि
संक्रमणाच्या वेळी, कुंभ
राशीसाठी संक्रमणापूर्वी १६ घटिका पुण्यकाळ असतो. मात्र यामध्ये रात्रीची वेळ घेत
नाहीत. पुण्याकालात स्नान, दान इ. गोष्टी अधिक शुभ मानल्या आहेत. म्हणून पुण्यकाल ८:००
ते १४:२५ असा आहे.
सामुदायिक
मुहूर्त ३० म्हणजे साम्यार्घ आहेत. रविच्या राशी संक्रमाणाच्या
वेळी असणाऱ्या चंद्र नक्षत्रावरून ३ प्रकारचे सामुदायिक मुहूर्त होतात. ते व
त्यांची फळे पुढील प्रमाणे:
·
१५ : महर्घ / जघन्य : फळ = तेजी
·
३० : साम्यार्घ : फळ = सम
·
४५ : समर्घ : फळ = मंदी
घबाड
७:१३
नंतर २८:१७ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: धनिष्ठा
चंद्र
नक्षत्र : अश्विनी
तिथी:
६
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६
x ३ = १८
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी
मिळवू : १८ + ६ = २४
आता
७ ने भागू २४ / ७ = ३ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
rprachi.blogspot.com
No comments:
Post a Comment