Monday, 8 February 2016

दिनविशेष - ९ फेब्रुवारी २०१६

तिथी
 माघ शुक्ल १ (१७:३७) 
वार
 मंगळवार     
नक्षत्र
 धनिष्ठा (१५:१६)
योग
 वरीयान (११:०९)
करण
 बालव (२८:१५)

विद्याव्याप्तिव्रत

एक मासव्रत. माघ शुक्ल प्रतिपदेपासून या व्रताचा आरंभ करतात. तिळांनी ह्रयग्रीवाची पूजा व तिळाचा होम, हे या व्रताचे विधान आहे. व्रताचे पहिले तीन दिवस उपवास करावयाचा असतो. व्रतावधी एक महिना.
फल -विद्या प्राप्ती

मृत्यु योग

१५:१६ नंतर मंगळवारी शततारका नक्षत्र असल्यामुळे मृत्युयोग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त

हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो. असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने वंग प्रांतात पहिला जातो. 
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष रहात नाही.

चंद्रदर्शन

अमावास्येला दिसेनासा झालेला चंद्र रविच्या पुढे १२ अंश गेला कि चंद्रदर्शन होते. १९:३१ ला पश्चिमेकडे चंद्रदर्शन होईल. सामुदायिक मुहूर्त १५ म्हणजे महर्घ आहेत. उत्तरशृंग आहे.

इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.

यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment