Sunday, 14 February 2016

दिनविशेष - १५ फेब्रुवारी २०१६

तिथी
 माघ शुक्ल ८ (२४:२७) 
वार
 सोमवार     
नक्षत्र
 कृत्तिका (२७:०९)
योग
 ब्रह्मा (१२:१७)
करण
 विष्टि (१३:१७)

दुर्गाष्टमी

प्रत्येक महिन्यातील शुक्ल अष्टमीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी दुर्गामातेचे पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.

भीष्माष्टमी

भीष्म तर्पणाने पापनाश
माघ शुक्ल अष्टमी दिवशी जवस, तीळ, गंध, फुले, गंगाजल, दर्भ आदींनी भीष्मांचे श्राद्ध अथवा तर्पण केल्याने अभीष्ट प्राप्त होते. मात्र तर्पण न केल्यास पाप घडते. त्याच दिवशी भीष्मांची पूजा करतात. त्यांना
'वसूनामवताराय शंतनोरात्मजाय च ।
अर्घ्यं ददामि भीष्माय आबालब्रह्मचारिणे ।'
या मंत्राने अर्घ्य द्यावा.

मोहिनीराजाचे नवरात्र

नगर जिल्ह्यात नेवासे गावी मोहिनीराजाचे मुख्य स्थान आहे. त्याचे नवरात्र करतात. माघ शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत नवरात्र असते. यात पूजा, आरती, नंदादीप, ब्राह्मणसुवासिनीभोजन, कथा-कीर्तन इ. कार्यक्रम असतात. पौष पौर्णिमेपासून माघ पौर्णिमेपर्यंत धरणे-पारणे करण्याची पद्धत आहे. रविवार हा या देवाचा वार आहे.

भद्रा

१३:१७ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment