तिथी
|
फाल्गुन कृष्ण ३ (२५:०९)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
स्वाती (२८:१२)
|
योग
|
व्याघात (१०:५१)
|
करण
|
वणिज (११:५३)
|
छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे)
शिवाजीचा जन्म १६२७ साली झाला अशी जेव्हा मान्यता होती तेव्हा जयंतीची तिथी
वैशाख शुद्ध तृतीया येत असे. जेव्हा जन्मसाल १६३० नक्की झाले तेव्हा तिथी फाल्गुन
वद्य तृतीया येऊ लागली. शिवाजीच्या जन्मावेळी जर ग्रेगेरियन कॅलेंडर असते तर १६३०
सालची फाल्गुन वद्य तृतीया १९ फेब्रुवारीला आली असती. म्हणून, २००१ सालापासून १९
फेब्रुवारी ह्या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते.
कल्पादि
ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभाची जी तिथी असते तिला कल्पादि
असे म्हणतात. पुढील सात तिथी कल्पादि आहेत.
१)
चैत्र - शुक्ल ५,
२)
चैत्र – कृष्ण ५
३)
वैशाख – शुक्ल ३
४)
कार्तिक - शुक्ल ७
५)
मार्गशीर्ष – शुक्ल ९
६)
माघ – शुक्ल १३
७)
फाल्गुन – शुक्ल ३
घबाड
२८:१२ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: उत्तराभाद्रपदा
चंद्र
नक्षत्र : विशाखा
तिथी:
१५ + ४ = १९
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८
x ३ = ५४
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १९ तिथी
मिळवू : ५४ + १९ = ७३
आता
७ ने भागू ७३ / ७ = १० ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
भद्रा
११:५३ नंतर २५:०९
पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment