Thursday, 17 March 2016

दिनविशेष - १९ मार्च २०१६


तिथी
 फाल्गुन शुक्ल ११ (१०:२०) 
वार
 शनिवार     
नक्षत्र
 पुष्य (९:४९)
योग
 अतिगंड (७:०१)
करण
 बव (२२:५३)

आमलकी एकादशी

फाल्गुन महिन्यातील शुक्ल एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात. या दिव्वाशी पुष्य नक्षत्र असेल तर ते अधिक श्रेष्ठ समजले जाते. आमलकी म्हणजे आवळा. आवळ्याला शास्त्रामध्ये श्रेष्ठ स्थान आहे. असे मानले जाते कि भगवान विष्णूंनी जेव्हा या सृष्टीची रचना करण्यासाठी ब्रह्माला जन्म दिला त्याच वेळी आवळ्याच्या वृक्षाला पण जन्म दिला. आवळ्याच्या वृक्षाच्या प्रत्येक भागात ईश्वराचा अंश आहे असे मानले जाते.

घबाड

१०:२० नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: उत्तराभाद्रपदा
चंद्र नक्षत्र : आश्लेषा
तिथी: १२
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११ x ३ = ३३
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १२ तिथी मिळवू : ३३ + १२ = ४५
आता ७ ने भागू  ४५ / ७ = ६ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

भद्रा

१०:२० पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment