Friday, 25 March 2016

दिनविशेष - २५ मार्च २०१६


तिथी
 फाल्गुन कृष्ण २ (२२:३५) 
वार
 शुक्रवार     
नक्षत्र
 चित्रा (२५:१०)
योग
 धृव (९:५२)
करण
 तैतिल (९:१८)

तुकाराम बीज

संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हा तुकारामांचा आराध्यदेव होता. तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरु ' म्हणून ओळखतात. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व संत कवी होते.
फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम महाराज वैकुंठवासी झाले. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो.

गुडफ्रायडे


गूड फ्रायडे म्हणजेच पवित्र शुक्रवार / चांगला शुक्रवार / काळा शुक्रवार किंवा महा शुक्रवार.  हा ख्रिस्ती धर्मातील एक सुटीचा दिवस आहे. ईस्टरच्या आधील शुक्रवारी हा सण पाळला जातो. ख्र्सिस्ती धर्मातील समजुतीप्रमाणे या दिवशी येशू ख्र्सिताला क्रॉसवर चढवण्यात आले. याची आठवण ठेवून ख्र्सिती जगात हा दिवस शोकदिवस म्हणून मानला जातो. काही ख्र्सिती पारंपारिक देशांमध्ये राष्ट्रीय दु:खवट्याप्रमाणे साजरा होतो. या दिवशी कोणत्याही आनंदायक कार्यक्रम साजरा करण्यात येत नाहीत. काही भाविक लोक चर्च मध्ये जाउन येशूने केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
ख्रिश्चन सण इंग्रजी तारखे प्रमाणे असतात मात्र या सणाचा संबंध पौर्णिमेशी आहे. २२ मार्च  नंतर  येणाऱ्या पौर्णिमे नंतरचा रविवार हा ईस्टर डे आणि इस्टरडे च्या आधीचा शुक्रवार हा गुडफ्रायडे असतो म्हणून त्याची तारीख आपलया सणा प्रमाणे दरवर्षी वेगळी असते !

(२१/२२ मार्च विषुवदिन म्हणतात. या दिवशी  दिनमान  आणि  रात्रीमान समान असते.)

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

No comments:

Post a Comment