तिथी
|
फाल्गुन कृष्ण १३ (२४:०४)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
शततारका (१०:३५)
|
योग
|
शुक्ल (२३:०७)
|
करण
|
गरज (१३:४०)
|
भौमप्रदोष
सूर्यास्तानंतर
पुढे ३ मुहूर्त (म्हणजे मध्यम मानाने
साधारण २ तास २४ मिनिटे ) प्रदोष काळ असतो.
प्रत्येक
चांद्र मासात प्रदोष काळी जेव्हा त्रयोदशी असेल त्या दिवशी प्रदोष निमित्त उपास
करतात.
‘कामनाभेद ' हा या व्रताचा विशेष
आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला हे व्रत करावे. याप्रमाणे एक
वर्षभर करावे. व्रतादिवशी प्रात: स्नान करुन
'मम पुत्रादिप्राप्तिकामनया
प्रदोषव्रतमहं करिष्ये'
इ. संकल्प करून व्रतारंभ करावा. सायंकाळी पुन्हा स्नान करावे. श्रीशंकराचे
पुढे बसून वेदपाठी ब्राह्मणाज्ञेप्रमाणे पुढील मंत्राने प्रार्थना करावी व
षोड्शोपचारे पूजा करावी.
भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे । ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥
भाजलेले सातूचे पीठ , तूप व साखरेचा नैवेद्य अर्पण
करावा. याप्रमाणे करून तेथेच आठ दिशांना आठ दिवे प्रज्वलित करावेत व प्रत्येक दिवा
लावताना आठ वेळा नमस्कार करावा.
'धर्मस्त्वं वृष रूपेण
जगदानन्दकारक।
अष्टमूर्तैरधिष्ठानं अथः पाहि सनातन ।'
या मंत्राने नंदिकेश्वराला पाणी दुर्वा आदि देऊन त्याची पूजा करावी व त्याला
स्पर्श करुन पुढील मंत्राने शंकर, पार्वती आणि नंदिकेश्वराची
प्रार्थना करावी.
ऋणरोगादि दारिद्र्यम ये चान्ये चापम्रुत्यव: !
भय क्लेश मनस्ताप: नश्यनंतु मम सर्वदा !!
"
( कर्ज,रोग,गरिबी,अपम्रूतू,भय, त्रास ईत्यादि मनस्ताप माझे कायमचे नाहिशे होवोत.)
हे व्रत विशेषत: स्त्रियांनी करण्याचे आहे. नंदीच्या शेपूट व शिंगे आदींच्या
स्पर्शाने अभीष्टसिद्धी होते.
Ø सोमवार: शांतीरक्षणासाठी सोम प्रदोष करावा.
Ø मंगळवार: ऋणमुक्त होण्यासाठी
भौम प्रदोष करावा.
Ø शुक्रवार: सौभाग्य किंवा
स्त्री-समृद्धीची इच्छा असेल तर शुक्रवारी हे व्रत करावे.
Ø शनिवार: पुत्र प्राप्तीसाठी
शनिप्रदोष वर्षभर किंवा फलप्राप्ती होई पर्यंत करावा.
Ø रविवार: आयुर्दायासाठी
अर्कप्रदोष हे व्रत करावे.
शिवरात्रि
कृष्ण
चतुर्दशीला शिवरात्रि साजरी करतात. निशीथ काळी (रात्रीचा आठवा मुहूर्त) शिवपूजेचे
विशेष महत्व आहे.
वारुणीयोग
अमान्त फाल्गुन कृष्ण
(पौर्णिमांत चैत्र कृष्ण) त्रयोदशीच्या दिवशी शततारका नक्षत्र असेल तर तो वारुणी
योग होतो. या योगावर गंगास्नान केले असता शंभर सूर्यग्रहणातील स्नानांचे फळ मिळते.
यावेळी शनिवार असेल तर तो ‘महावारुणी’ योग होतो. त्यात शुभ योग असेल, तर तो
‘महामहावारुणी’ योग होऊन त्या योगावर गंगास्नान केले तर तीन कोटी कुलांचा
उद्धार होतो अशी मान्यता आहे.
सूर्योदयापासून १०:३५
पर्यंत शततारका नक्षत्र असल्यामुळे वारुणी योग होत आहे.
मृत्यू योग
१०:३५ पर्यंत मंगळवारी
शततारका नक्षत्र असल्यामुळे मृत्यू योग होत आहे.
हा
योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
|
सोमवार – उत्तराषाढा
|
मंगळवार – शततारका
|
बुधवार – अश्विनी
|
गुरुवार – मृग
|
शुक्रवार – आश्लेषा
|
शनिवार – हस्त
|
|
हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो.
असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने वंग प्रांतात पहिला जातो.
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने वंग प्रांतात पहिला जातो.
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष
रहात नाही.
भद्रा
२४:०४ नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment