Thursday, 17 March 2016

दिनविशेष - २२ मार्च २०१६

तिथी
 फाल्गुन शुक्ल १४ (१५:१३) 
वार
 मंगळवार     
नक्षत्र
 पूर्वाफाल्गुनी (१६:१९)
योग
 शूल (७:२४)
करण
 विष्टी (२८:२०)

कुर्चव्रत

हे एक काम्य व्रत आहे. फाल्गुन शुक्ल चतुर्दशी दिवशी उपवास, पौर्णिमेला पंचगव्य प्राशन आणि वद्य प्रतिपदेचे हविष्यान्न भोजन असा याचा विधी आहे.
फल - त्या मासातल्या पापचे निराकरण व इंद्राची प्रसन्नता.

सर्वार्तिहरव्रत

हे एक काम्य व्रत आहे.
याचा विधी असा - फाल्गुन शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी प्रात:स्नानादी नित्यकर्मे आटोपल्यावर
'मम सकलपापतपप्रशमनकामनया ईश्वरप्रीतये सर्वार्तिहरव्रतं करिष्ये'
असा संकल्प करावा. मग कामक्रोधादी विषयांचा व मिथ्या भाषणांदींचा त्याग करून सूर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत सूर्यसन्मुख राहावे. त्यानंतर पुनश्च स्नान करून विधिवत सूर्यपूजा करावी. रात्री निराहार राहून दुसर्‍या दिवशी उपवास सोडावा.
फल - रोगमुक्ती व पापनाश.

भद्रा


१५:१३ नंतर २८:२० पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment