Wednesday, 30 March 2016

दिनविशेष - २ एप्रिल २०१६

तिथी
 फाल्गुन कृष्ण ९ (८:३४) 
वार
 शनिवार     
नक्षत्र
 उत्तराषाढा (१४:२६)
योग
 शिव (१०:३६)
करण
 वणिज (२०:०७)

दग्ध योग

८:३४ पर्यंत शनिवारी नवमी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


घबाड

१४:२६ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: रेवती
चंद्र नक्षत्र : श्रवण
तिथी: १५ + १० = २५
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २३
२३ x ३ = ६९
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे २५ तिथी मिळवू : ६९ + २५ = ९४
आता ७ ने भागू  ९४ / ७ = १३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

भद्रा


२०:०७ नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment