Sunday, 13 December 2015

दिनविशेष - १४ डिसेंबर २०१५

तिथी
 मार्गशीर्ष शुक्ल ३ (१५:०१) 
वार
 सोमवार    
नक्षत्र
 उत्तराषाढा (२५:४३)
योग
 ध्रुव (२८:१९)
करण
 वणिज (२६:३३)

अनंतर्यव्रत

एक स्त्रीव्रत. व्रतारंभ मार्गशीर्ष शुक्ल तृतीयेपासून करतात. प्रत्येक पंधरवड्यातल्या तृतीयेस उपवासपूर्वक उमेची पूजा करणे, हा या व्रताचा विधी आहे. व्रतावधी एक वर्ष.
फल- पतिपुत्रांचा अवियोग.

आनंद तृतीया व्रत

वैशाख, भाद्रपद व मार्गशीर्ष या मासातल्या तृतीयेस ललितादेवीची पूजा करून त्याचबरोबर सुवासिनींचीही पूजा करणे, हा या व्रताचा विधी आहे.

अभीष्ट तृतीया

मार्गशीर्ष शुक्ल तृतीयेस हे व्रत करतात. एक तिथिव्रत. या दिवशी गौरीची पूजा करून अभीष्ट सिद्धीसाठी तिची प्रार्थना करतात.

गिरीतनयाव्रत

मार्गशीर्ष शुक्ल तृतीयेस या व्रताचा आरंभ करतात. प्रत्येक महिन्यात निरनिराळ्या नावांनी व फुलांनी गौरीची पूजा करावयाची असते, असा या व्रताचा विधी आहे.व्रतावधी -एक वर्ष.

नामतृतीया

हे तिथिव्रत आहे. मार्गशीर्ष शुक्ल तृतीयेस या व्रताचा आरंभ करतात. व्रतावधी एक वर्ष. गौरी, काली, उमा, भद्रा, दुर्गा, कांती, सरस्वती, मंगला, वैष्णवी, लक्ष्मी, शिवा, नारायणी या गौरीच्या बारा नावांपैकी एकेका नावाने प्रत्येक महिन्याला तिची पूजा करतात. या व्रताचे आणखी दोन पर्याय आहेत ते असे-
(१) अर्धनारीनटेश्‍वर हे महेश्‍वराचे रूप समजून त्याची पूजा करणे.
(२) केशवापासून दामोदरापर्यंतच्या बारा नावांपैकी एकेका नावाने हरिहराच्या मूर्तीची एकेक महिना पूजा करणे
फल- स्वर्गप्राप्ती.

अमृतयोग

२५:४३ नंतर सोमवारी श्रवण नक्षत्र असल्यामुळे होणारा अमृतसिद्धी योग होत आहे. हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज

मृत्यू योग

२५:४३ पर्यंत सोमवारी उत्तराषाढा नक्षत्र असल्यामुळे मृत्यू योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त


भद्रा


२६:३३ नंतर भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment