Thursday, 31 December 2015

दिनविशेष - ४ जानेवारी २०१६

तिथी
 मार्गशीर्ष कृष्ण १० (२९:१३) 
वार
 सोमवार    
नक्षत्र
 स्वाती (२९:१७)
योग
 सुकर्मा (१७:०६)
करण
 वणिज (१६:१०)

दग्धयोग

२९:१३ नंतर सोमवारी एकादशी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी



यमघंट योग

२९:१७ नंतर सोमवारी विशाखा नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त



घबाड

२९:१३ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: पूर्वाषाढा
चंद्र नक्षत्र : स्वाती
तिथी: १५ + १० = २५
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २३
२३ x ३ = ६९
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे २५ तिथी मिळवू : ६९ + २५ = ९४
आता ७ ने भागू  ९४ / ७ = १३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

भद्रा


१६:१० नंतर २९:१३ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment