Sunday, 27 December 2015

दिनविशेष - २९ डिसेंबर २०१५

तिथी
 मार्गशीर्ष कृष्ण ४ (१५:२९) 
वार
 मंगळवार    
नक्षत्र
 आश्लेषा (१३:०२)
योग
 विष्कंभ (१३:२०)
करण
 कौलव (२८:०८)

रवि पूर्वाषाढा नक्षत्र प्रवेश

१६:५९ ला रवि पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश करत आहे.

दग्धयोग

१५:२९ नंतर मंगळवारी पंचमी असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी



घबाड

१३:०२ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: मूळ
चंद्र नक्षत्र : आश्लेषा
तिथी: १५ + ४ = १९
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८ x ३ = ५४
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १९ तिथी मिळवू : ५४ + १९ = ७३
आता ७ ने भागू  ७३ / ७ = १० ३/७

बाकी ३ म्हणून घबाड.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment