Thursday, 31 December 2015

दिनविशेष - १ जानेवारी २०१६

इसवी सन आरंभाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !


तिथी
 मार्गशीर्ष कृष्ण ७ (२१:३९) 
वार
 शुक्रवार    
नक्षत्र
 उत्तराफाल्गुनी (२०:२७)
योग
 सौभाग्य (१४:२८)
करण
 विष्टी (०८:२०)

इसवी सन २०१६ प्रारंभ

इसवी सन २०१६ चा प्रारंभ होत आहे. संपूर्ण जगभरात नवीन वर्षाचे स्वागत उत्साहाने केले जाते.

रक्त सप्तमी

मार्गशीर्ष कृष्ण सप्तमीला व्रतारंभ करतात. रक्त कमळांनी, ती न मिळाल्यास पांढरी फुले व रक्तचंदन यांनी सूर्यमूर्तीची पूजा करतात, हा त्याचा मुख्य विधी आहे. पूजेत वडे आणि खिचडी यांचा नैवेद्य दाखवितात. उद्यापनाच्या वेळी तांबड्या वस्त्राची जोडी दान देतात.

दग्ध योग

२१:३९ नंतर शुक्रवारी अष्टमी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


भद्रा


८:२० पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.


No comments:

Post a Comment