तिथी
|
मार्गशीर्ष कृष्ण ८ (२४:२२)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
हस्त (२३:३५)
|
योग
|
शोभन (१५:२५)
|
करण
|
बालव (११:०१)
|
कालाष्टमी
प्रत्येक
महिन्यातील कृष्ण अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी शिव पूजन शुभ
मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.
अनघा व्रत
एक तिथिव्रत. मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीस गोमयाने पवित्र केलेल्या वेदीवर अनघ व
अनघा या नावांनी दोन शहाळी स्थापन करून त्यांची पूजा करावी व पुढे एक वर्षपर्यंत
प्रत्येक वद्य अष्टमीस हे व्रत चालवून मग त्याची सांगता करावी, असे हेमांद्रीने सांगितले आहे.
फल-पापनाश.
अष्टका-श्राद्ध
मार्गशीर्ष कृष्ण अपराह्
न-व्यापिनी अष्टमीच्या दिवशी शास्त्रोक्त विधीने अष्टका-श्राद्ध करावे.
ब्राह्मणभोजन घालून त्यांचा तोषवावे, त्यामुळे उत्तम फल मिळते, आणि न केल्यास दोष लागतो.
रुक्मिणी अष्टमी
मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीच्या
दिवशी कृष्ण, रुक्मिणी व प्रद्युम्न यांच्या सुवर्णाच्या
मूर्ती करून त्यांचे सुगंधी जलाने आणि गंधादीने पूजन करावे. नैवेद्याला उत्तम
पदार्थ अर्पण करावेत आणि सामर्थ्य असल्यास आठ सुवासिनीना चांगली वस्त्रे देऊन
दक्षिणा द्यावी. यामुळे रुक्मिणीची प्रसन्नता मिळते.
दग्धयोग
२४:२२ नंतर शनिवारी नवमी तिथी
असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार
यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती
मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
|
मृत्यू योग
२३:२५ पर्यंत शनिवारी हस्त
नक्षत्र असल्यामुळे मृत्यू योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग
वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
|
सोमवार – उत्तराषाढा
|
मंगळवार – शततारका
|
बुधवार – अश्विनी
|
गुरुवार – मृग
|
शुक्रवार – आश्लेषा
|
शनिवार – हस्त
|
|
यमघंट योग
२३:३५ पर्यंत शनिवारी हस्त
नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग
वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
|
सोमवार – विशाखा
|
मंगळवार – आर्द्रा
|
बुधवार – मूळ
|
गुरुवार – कृत्तिका
|
शुक्रवार – रोहिणी
|
शनिवार – हस्त
|
|
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment