तिथी
|
मार्गशीर्ष शुक्ल ८ (७:४७), मार्गशीर्ष
शुक्ल ९ (२९:४४)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
उत्तराभाद्रपदा (२१:१३)
|
योग
|
व्यतिपात (१५:५७)
|
करण
|
बालव (१८:४७)
|
दुर्गाष्टमी
प्रत्येक
महिन्यातील शुक्ल अष्टमीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी दुर्गामातेचे पूजन
शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.
कल्पादि
ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभाची जी तिथी असते तिला कल्पादि
असे म्हणतात. पुढील सात तिथी कल्पादि आहेत.
१)
चैत्र - शुक्ल ५,
२)
चैत्र – कृष्ण ५
३)
वैशाख – शुक्ल ३
४)
कार्तिक - शुक्ल ७
५)
मार्गशीर्ष – शुक्ल ९
६)
माघ – शुक्ल १३
७)
फाल्गुन – शुक्ल ३
श्रवणिका व्रत
हे व्रत
मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थीस व अष्टमीस करतात. या तिथींना ब्राह्मण, कुमारिका यांना भोजन घालावयाचे असते. कुमारिकांच्यापुढे
बारा जलपात्रे आलंकृत करुन ठेवावीत आणि एक जलपात्र स्वतःच्या मस्तकावर ठेवून
केशवाचे ध्यान करावे, असे सांगितले आहे.
श्रीदत्तात्रय नवरात्र
मार्गशीर्ष शुक्ल अष्टमीस दत्तात्रयाच्या नवरात्राची
यथाविधी स्थापना करतात. या नवरात्राच्या दिवसांत व्रतस्थ राहून गुरु-चरित्राच्या
पारायणाचा सप्ताह करतात. सप्ताहाच्या शेवटी पौर्णिमेच्या दिवशी दत्तात्रयाच्या
मूर्तीचे पूजन करून ब्राह्मणभोजन घालून पारणे सोडतात.
नंदिनी नवमी
मार्गशीर्ष शुक्ल नवमीला 'नंदिनी नवमी' असे म्हणतात. या दिवसापासून तीन रात्रीपर्यंत देवीची
यथासांग पूजा करावी, म्हणजे अश्वमेध यज्ञाचे फळ मिळ्ते.
दग्ध योग
७:४७ नंतर २९:४४ पर्यंत शनिवारी नवमी
असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार
यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये
हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
|
क्षय दिन
ज्या
तिथीला कोणताही सूर्योदय होत नाही ति क्षय तिथी असते.
लागोपाठच्या
दोन सूर्योदयाच्या वेळी एकचतिथी असेल तर तिला तिथी वृद्धी म्हणतात.
क्षय
तिथी, वृद्धी तिथी, कृ. १३, कृ १४, अमावास्या व शु. १ या सहा तिथी शुभ कार्यासाठी
पूर्णपणे अशुभ सांगितलेल्या आहेत.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment