तिथी
|
मार्गशीर्ष शुक्ल १४ (१८:२७)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
रोहिणी (१३:२४)
|
योग
|
शुभ (२१:४४)
|
करण
|
गरज (७:२८), विष्टी (२९:३१)
|
पिशाच्च मोचन यात्रा
ही सांवत्सरिक
यात्रा मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीला निघते. या दिवशी कपर्दीश्वरा ( शिव )- समीप
स्नान करून यात्रा करावी. ही यात्रा करणाराला अन्यत्र मृत्यू आला तरी तो पिशाच-योनीत
जात नाही, आणि तीर्थादी ठिकाणी घेतलेल्या दानाचे पाप नष्ट
होते.
शिवचतुर्दशी व्रत
शास्त्रामध्ये या
व्रताचे विशेष विधान सांगितलेले आहे. या व्रतात मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशीला
एकभुक्त राहून चतुर्दशीला निराहर उपवास करावा. शिवाची पूजा करावी. पुजनात स्नान
घातल्यानंतर
'शिवाय नमः पादौ ।
सर्वात्मने शिरः
।
त्रिनेत्राय
ललाटम् ।
हराय
नेत्रयुग्मम् ।
इन्दुमुखाय मुखम्
।
श्रीकंठाय
स्कन्धौ ।
सद्यौजाताय कर्णो
।
वामदेवाय भुजौ ।
अघोरहृदयाय हृदयम
।
तत्पुरुषाय
स्तनौ।
ईशानाय उदरम् ।
अनंतधर्माय
पार्श्वम् ।
ज्ञानभूताय कटिम्
।
अनंतवैराग्यसिंहाय
ऊरू ।
प्रधानाय जंघे ।
व्योमात्मने
गुल्फौ ।
व्युप्तकेशात्मरूपाय
पृष्ठम् अर्चचामि ।
याप्रमाणे
अंगपूजा करून
'नमः पुष्टयै, नमस्तुष्टयै ।
म्हणून
पार्वतीपूजन करावे. त्यानंतर
प्रीयतां
देवदेवोऽत्र सद्योजातः पिनाकधृक्'
अशी प्रार्थना
करावी व वृषभ, सूवर्ण , जलपूर्ण कलश, गंध,
पंचरत्न, आणि अनेक प्रकारचे भोजनपदार्थ ब्राह्माणाला अर्पण करावे व
थोडे तूप सेवन करून भूमीवर झोपावे. नंतर पौर्णिमेला ब्राह्मणांची पूजा करून त्यास
जेवू घालावे. अशा प्रकारे वद्य चतुर्दशीसही करावे, पुढे प्रत्येक
महिन्याच्या दोन्ही चतुर्दशींना शिवपूजनादी केल्यावर
मार्गशीर्षात
|
गोमूत्र
|
पौषात
|
गोमय
|
माघात
|
गोदुग्ध
|
फाल्गुनात
|
गोदधी
|
चैत्रात
|
गोघृत
|
वैशाखात
|
कुशोदक
|
ज्येष्ठात
|
पंचगव्य
|
आषाढात
|
बिल्व
|
श्रावणात
|
जव
|
भाद्रपदात
|
गोशृंगजल
|
आश्विनात
|
जल
|
कार्तिकात
|
काळे तीळ
|
याप्रमाणे पदार्थ
यथाविधी भक्षण करावे.
शिवपुजनास
निरनिराळ्या महिन्यात निरनिराळी फुले घ्यावीत.
मार्गशीर्षात
|
कमळे
|
पौषात
|
मंदाराची फुले
|
माघात
|
मालती
|
फाल्गुनात
|
धोतरा
|
चैत्रात
|
निर्गुडीची
|
वैशाखात
|
अशोक
|
ज्येष्ठात
|
मल्लिका
|
आषाढात
|
पाटल
|
श्रावणात
|
अर्कपुष्प
|
भाद्रपदात
|
कदंब
|
आश्विनात
|
शतपत्री
|
कार्तिकात
|
उत्पल (कमल)
|
अशा तर्हेने
पूजन केल्याने देवदेवेश महादेव प्रसन्न होतात व महाफल प्राप्त होते. शास्त्रात
म्हटले आहे की, हे व्रत केल्याने महाफल मिळते.
श्री दत्तात्रेय जयंती - गाणगापूर क्षेत्री श्री
दत्त जयंती उत्सव
ही पौर्णिमा
प्रदोषव्यापिनी घ्यावी. मार्गशीर्ष पौर्णिमेदिवशी म्रुग नक्षत्रात बुधवारी
सायंकाळी अत्रिऋषीची पत्नी अनसूया प्रसूत झाली . अत्रिऋषींनी तो प्रत्यक्ष विष्णू
जन्माला आला, असे समजून त्याचे नामकरण केले. ईश्वर स्वतः
आपणाते देता झाला म्हणून तो दत्त आणि स्वस्थ म्हणजे अत्रीचा पुत्र असल्यामुळे
आत्रेय, मिळून दत्तात्रेय असे नाव ठेवले. म्हणून
जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात होतो. त्या दिवशी गुरुचरित्राचे पारायण, सायंकाळी जन्माचे किर्तन इ. कार्यक्रम करतात. ज्यांना
गुरुचरित्राचे पारायण शक्य नसेल, ते सात दिवस गुरु
दत्तात्रेयाच्या नाममंत्राचा जप करतात. या दिवशी दत्तात्रेय - नवरात्र संपते.
ईद-ए-मिलाद
इस्लाम
धर्मियांचा हा एक प्रमुख सण आहे. हजरत मुहम्मद यांचा जन्म दिवस म्हणून हा सण साजरा
केला जातो.
मृत्यू योग
१३:२४ नंतर गुरुवारी मृग
नक्षत्र असल्यामुळे मृत्यू योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग
वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
|
सोमवार – उत्तराषाढा
|
मंगळवार – शततारका
|
बुधवार – अश्विनी
|
गुरुवार – मृग
|
शुक्रवार – आश्लेषा
|
शनिवार – हस्त
|
भद्रा
१८:२७ नंतर २९:३१ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.
विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment