तिथी
|
मार्गशीर्ष शुक्ल १३ (२०:३३)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
कृत्तिका (१४:५२)
|
योग
|
साध्य (२४:३७)
|
करण
|
कौलव (९:४१)
|
प्रदोष
सूर्यास्तानंतर
पुढे ३ मुहूर्त (म्हणजे मध्यम मानाने
साधारण २ तास २४ मिनिटे ) प्रदोष काळ असतो.
प्रत्येक
चांद्र मासात प्रदोष काळी जेव्हा त्रयोदशी असेल त्या दिवशी प्रदोष निमित्त उपास
करतात.
‘कामनाभेद ' हा या व्रताचा विशेष
आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला हे व्रत करावे. याप्रमाणे एक
वर्षभर करावे. व्रतादिवशी प्रात: स्नान करुन
'मम पुत्रादिप्राप्तिकामनया
प्रदोषव्रतमहं करिष्ये'
इ. संकल्प करून व्रतारंभ करावा. सायंकाळी पुन्हा स्नान करावे. श्रीशंकराचे
पुढे बसून वेदपाठी ब्राह्मणाज्ञेप्रमाणे पुढील मंत्राने प्रार्थना करावी व
षोड्शोपचारे पूजा करावी.
भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे । ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥
भाजलेले सातूचे पीठ , तूप व साखरेचा नैवेद्य अर्पण
करावा. याप्रमाणे करून तेथेच आठ दिशांना आठ दिवे प्रज्वलित करावेत व प्रत्येक दिवा
लावताना आठ वेळा नमस्कार करावा.
'धर्मस्त्वं वृष रूपेण
जगदानन्दकारक।
अष्टमूर्तैरधिष्ठानं अथः पाहि सनातन ।'
या मंत्राने नंदिकेश्वराला पाणी दुर्वा आदि देऊन त्याची पूजा करावी व त्याला
स्पर्श करुन पुढील मंत्राने शंकर, पार्वती आणि नंदिकेश्वराची
प्रार्थना करावी.
ऋणरोगादि दारिद्र्यम ये चान्ये चापम्रुत्यव: !
भय क्लेश मनस्ताप: नश्यनंतु मम सर्वदा !!
"
( कर्ज,रोग,गरिबी,अपम्रूतू,भय, त्रास ईत्यादि मनस्ताप माझे कायमचे नाहिशे होवोत.)
हे व्रत विशेषत: स्त्रियांनी करण्याचे आहे. नंदीच्या शेपूट व शिंगे आदींच्या स्पर्शाने
अभीष्टसिद्धी होते.
Ø सोमवार: शांतीरक्षणासाठी सोम प्रदोष करावा.
Ø मंगळवार: ऋणमुक्त होण्यासाठी
भौम प्रदोष करावा.
Ø शुक्रवार: सौभाग्य किंवा
स्त्री-समृद्धीची इच्छा असेल तर शुक्रवारी हे व्रत करावे.
Ø शनिवार: पुत्र प्राप्तीसाठी
शनिप्रदोष वर्षभर किंवा फलप्राप्ती होई पर्यंत करावा.
Ø रविवार: आयुर्दायासाठी
अर्कप्रदोष हे व्रत करावे.
अनंगत्रयोदशी
मार्गशीर्ष शुक्ल
त्रयोदशीला नदी, तलाव, विहीर या ठिकाणी अगर घरी
स्नान करुन अनंग नर्मदेश्वर महादेवीची गंधाक्षता, पूष्प, धूपदीप आणि नैवेद्यादी उपचारपूर्वक पूजन करून व्रत करावे.
विशेष गोष्ट अशी की, मार्गशीर्षादी महिन्यांत- १ मधू, २ चंदन, ३ न्यग्रोध, ४ बदरिफल, ५ करंज, ६ अर्कपुष्प, ७ जांभूळ, ८ आघाडा, ९ कमलपुष्प, १० पळस, ११ कुब्ज-अपामार्ग आणि १२
कदंब यांचे यथाक्रम पूजन व सेवन (रसप्राशन) करावे. विशेष विधान मूळ ग्रंथात
पाहावे. या व्रताने शंकर प्रसन्न होतो.
२) या तिथीपासून
एक वर्षभर प्रत्येक त्रयोदशीस अनंगाची (कामाची) निरनिराळ्या नावांनी, फुलांनी आणि नैवेद्यांनी पूजा करतात.
अयन करिदिन
उत्तरायणानंतरचा दिवस म्हणून हा करिदिन आहे. ग्रहण
दिवस, होळी, आयन दिन (उत्तरायण आणि दक्षिणायनाचा दिवस), भावुका अमावास्या व
प्रेतदाहविधीचा दिवस अशा ५ प्रकारच्या दिवसांच्या दुसऱ्या दिवसाला करिदिन म्हणतात.
हे ५ दिवस व त्यापुढचा म्हणजे करिदिन सर्व शुभ कार्याला वर्ज समजले जातात.
घबाड
१४:५२ नंतर २०:३३ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: मूळ
चंद्र
नक्षत्र : रोहिणी
तिथी:
१३
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १३
१३
x ३ = ३९
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १३ तिथी
मिळवू : ३९ + १३ = ५२
आता
७ ने भागू ५२ / ७ = ७ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment