Friday, 12 October 2018

दिनविशेष - १४ ऑक्टोबर २०१८


तिथी
आश्विन शुक्ल ६ (अहोरात्र)
वार
रविवार
नक्षत्र
जेष्ठा (१३:१४)
योग
सौभाग्य (७:००)
करण
कौलव (--:--), कौलव (१९:१२)


बिल्वनिमंत्रण

आश्‍विन शुक्ल षष्ठीला प्रात:स्नानादी नित्यकर्मे झाल्यावर देवीची पूजा करावी आणि ज्येष्ठा नक्षत्र असेल तर त्यांच्या पूजेसाठी बिल्ववृक्षाला निमंत्रण करावे.

सरस्वती आवाहन

१३:१४ नंतर मूळ नक्षत्रावर सरस्वती आवाहन करावे.
आश्‍विन शुक्ल सप्तमीपासून नवमीपर्यंत सरस्वतींचे शयनव्रत करतात. यासाठी सप्तमीला पुस्तकादिकांचे पूजन करून सरस्वतीचे शयन करावे. स्वत: व्रतस्थ राहावे. पठण-पाठण, लेखन आदी गोष्टी बंद ठेवाव्या. सप्तमीपासून दशमीपर्यंत पुस्तकादिकांची पूजा करावी. पूजेसाठी सरस्वतीची सुवर्णाची, पाषाणाची किंवा चित्रयुक्‍त मूर्ती असावी. ती चतुर्भुजा, सर्वालंकारमंडित असावी. तिच्या उजवीकडील दोन हातांत पुस्तक व रुद्राक्षमाला असावी आणि डावीकडील दोन हातांत वीणा व कमंडलू असावा. अशा विराजमान-शोभायमान-मूर्तीचे ध्यान करावे.


घबाड

१३:१४ नंतर घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: चित्रा
चंद्र नक्षत्र : मूळ
तिथी: शुक्ल ६ = ६
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
x ३ = १८
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता ७ ने भागू  २४ / ७ = ३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

षष्ठी श्राद्ध

अपराण्ह काळी षष्ठी तिथी असल्यामुळेश्राद्धतिथी आश्विन शुक्ल ६ असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

No comments:

Post a Comment