तिथी
|
आश्विन शुक्ल १० (१७:५७)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
धनिष्ठा (२७:२४)
|
योग
|
शूल (१०:४२)
|
करण
|
गरज (१७:५७), वणिज (--:--)
|
श्रीमध्वाचार्य जयंती
मध्वाचार्य पूर्णप्रज्ञ व
आनंदतीर्थ या नावानेही प्रसिद्ध आहेत. त्यांना हनुमान आणि भीमानंतर वायूचा तिसरा
अवतार मानले आहे. टे द्वैतवाद नावाने प्रसिद्ध असलेल्या तत्ववादाचे प्रवर्तक आहेत.
'महाभारततात्पर्यनिर्णय' हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. भागवतगीता आणि
ऋग्वेदातील पहिल्या ४० सुक्तांवर देखील त्यांचे भाष्य प्रसिद्ध आहे.
दशमी श्राद्ध
अपराण्ह काळी दशमी तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी आश्विन शुक्ल १० असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त
अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment